रयतसंदेश न्युज नेटवर्क :-
अमळनेर ( प्रतिनिधी)- कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय, मारवड येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व विद्यार्थी विकास विभागांतर्गत आज दि. 9 ऑगस्ट 2024 शुक्रवार रोजी ‘ऑगस्ट क्रांती दिन’ व ‘जागतिक आदिवासी दिना’निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून इतिहास विभाग प्रमुख प्रा.डॉ. दिलीप कदम उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देसले यांनी भुषविले. सरस्वती पूजन व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. जितेंद्र माळी यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. दिलीप कदम यांनी ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त आपले विचार मांडले.
चले जाव आंदोलन हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे अखेरचे जनआंदोलन असून यातून स्वातंत्र्याचा मार्ग मोकळा झाला. चले जाव आंदोलनात सर्वात जास्त योगदान महाराष्ट्राने दिले. चले जाव हा नारा मेहेर युसुफ अली यांच्या संकल्पनेतून आला. यामधून महात्मा गांधींनी करेंगे या मरेंगे चा नारा दिला. या आंदोलनाची फलनिष्पत्ती म्हणजे स्वातंत्र्य होय,अशी भूमिका त्यांनी मांडली.
महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. सतीश पारधी यांनी आदिवासींच्या सद्यस्थितीवर प्रकाश टाकला. आज उच्च शिक्षित तरुणांमूळे आदिवासी समाज परिवर्तनाच्या वाटेवर असून त्यांच्या राहणीमानात सुधारणा होत आहे. समाजातील लोकांनी स्वयं रोजगाराच्या माध्यमातून रोजगार निर्माण केला असून प्रगत समाजाच्या बरोबरीने प्रगती करीत आहे. देशाच्या विकासात आदिवासी समाजाचे देखील मोठे योगदान असल्याचे त्यांनी मनोगतातून व्यक्त केले.
प्रस्तुत कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयातील प्राचार्य मा. डॉ. वसंत देसले यांनी आदिवासींच्या अनेक शासकीय योजनांची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीतील आदिवासी समाजाचे योगदान विद्यार्थ्यांसमोर मांडले.
महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.नंदा कंधारे यांनी उपस्थितांचे आभार मानले. सदर कार्यक्रमाला प्रा. विजयकुमार पाटील, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.व्हि. डी. पाटील, प्रा.डॉ.देवदत्त पाटील, प्रा. डॉ. संजय पाटील, प्रा. डॉ. माधव वाघमारे, प्रा. डॉ. संजय महाजन, प्रा.डॉ. पवन पाटील, प्रा. किशोर पाटील,श्री. जगदीश साळुंखे,श्री. सचिन पाटील, श्रीमती मंजुषा गरूड, श्री . दिलीप चव्हाण, श्री.अतुल साळुंखे, श्री. शामकांत पाटील, श्री. सचिन साळुंखे आणि विद्यार्थी उपस्थित होते.