जिया शाह व पियुषा जाधवला “साईरत्न” पुरस्कार प्रदान.

*अमळनेर रयतसंदेश न्युज नेटवर्क*  : –

साई इंग्लिश
अकॅडमि,अमळनेर या कोचिंग
क्लासेसतर्फे प्रत्येक वर्षी देण्यात
येणारा,अत्यंत बहुमानाचा व इ.10 वी
च्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारा
“साई रत्न” पुरस्कार यंदा जिया शाह व
पियुषा जाधव या विद्यार्थीनींना प्रदान
करण्यात आला. रविवार,दि. 24 रोजी
झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात
वेगवेगळ्या स्पर्धेतील 116 विजेत्यांना
मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

सदरील सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी
मुंबई उच्च न्यायालयाचे ॲड.कौस्तुभ
पाटील होते. तर प्रमुख अतिथी म्हणून
उपजिल्हाधिकारी नंदुरबार हरिष
भामरे, आदिवसी विकास
आयुक्तालय,नाशिकचे सह आयुक्त
(वित्त) कपिल पवार, तसेच पारोळा
कोर्टाच्या सरकारी वकील सौ.प्रतिभा
मगर, साई इंग्लिश अकॅडमिचे
कार्यकारी संचालक-भैय्यासाहेब मगर,
तसेच अनेक विद्यार्थी व अनेक पालक
तसेच अकॅडमिचे शिक्षकवृंद उपस्थित होते.सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत-जिया व पियूषा यांना यंदाचा “साई रत्न” पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. हुशार व होतकरू असे जिया व पियूषा हे अगदी सुरुवातीपासूनच साई इंग्लिश अकॅडमिचे नियमित विद्यार्थी आहेत.पॅनल द्वारा मुलाखत घेऊन ‘साई रत्न’ निवडणारा साई इंग्लिश अकॅडमि हा संपूर्ण महाराष्ट्रातील एकमेव क्लास अशी ओळख,याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, असे साई इंग्लिश अकॅडमि संचालक-भैय्यासाहेब मगर यांनी सांगितले.

You cannot copy content of this page