रयतसंदेश न्युज नेटवर्क :-
अमळनेर (प्रतिनिधी )- मारवड ता.अमळनेर येथील कै नानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात आधुनिक भारताचे ग्रंथालय शास्त्राचे जनक पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन यांची 132 वी जयंती साजरी करण्यात आली, या दिवशी ‘ग्रंथपाल दिन’म्हणून साजरा करण्यात आला,याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्ही. एस. देसले यांनी डॉ.एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.
भारताचे महान ग्रंथपाल गणितज्ञ पद्मश्री डॉ. एस.आर. रंगनाथन यांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले. प्रा. विजय पाटील यांनी डॉ.एस. आर. रंगनाथन यांच्या संपूर्ण जीवनपटाचे महत्व पटवून दिले.डॉ. एस. आर. रंगनाथन यांनी ग्रंथालय शास्त्राला नवी दिशा दिली, असून त्यांनी ग्रंथालय शास्त्राचे पाच सिद्धांत मांडले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विजय पाटील यांनी केले.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष पद प्राचार्य डॉ. व्ही. एस. देसले यांनी भूषविले,आभार प्रा. डॉ.एस.एच.पारधी यांनी मानले,यावेळी महाविद्यालयीन सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.