प्रा.अशोक पवार यांच्या वाढदिवसा निमित्त समाज प्रबोधन मेळावा तरुणांना उर्जा देणारा – मा.खा.उन्मेष पाटील.

रयतसंदेश न्युज नेटवर्क:-

अमळनेर( प्रतिनिधी)- मराठा समाज मंगल कार्यालयात समाज प्रबोधन मेळाव्यात प्रा.डॉ. मिलिंद बागुल यांनी सांगितले की आजच्या काळात संविधानाचे संरक्षण करण्याची गरज आहे. जनमानसात अस्थिरतेचे वातावरण आहे. यावेळी पोलीस टुडे चे संपादक रत्नदीप सिसोदिया यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत प्रा पवार सरांनी आम्हाला चळवळीत कसे घडवले याचे काही किस्से सांगितले.पुढील वक्ते मा.खलील देशमुख यांनी विचार मांडताना वाढदिवस साजरा करतांना समाज प्रबोधन करणे हे काळाची गरज आहे. ते काम प्रा.पवार सर करताय याचे मला फार कौतुक आहे.अमळनेरात अभ्यासु व्यक्तीमत्वाला जनतेचे नेतृत्वाची करण्याची गरज असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.

मागील काळातील दमदार आमदार पुरोगामी विचारांचा प्रभाव असलेले मा.आ.गुलाबरावबापू पाटील यांच्या सारख्या समाज हितैशी नेतृत्वाची गरज आहे.” हे असे आहे तरीपण असे असणार नाही.” या दर्जेदार गजलेतुन त्यांनी विचार व्यक्त केले. मा.मुकुंदराव सपकाळे: लोकशाही ज्या मार्गाने संपवण्याचे षडयंत्र रचले जात आहे, त्या व्यवस्थेत आम्ही संविधानाचे संरक्षण करण्यासाठी प्राण पणाला लावून काम करण्यासाठी गरज आहे. यापुढे आपण एकजूट राहून काम करु असा संकल्प आज मी वाढदिवसाच्या निमित्ताने करतो.

मा.प्रमोद पाटील जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस मा.शरदचंद्र पवार यांनी विचार मांडताना आजच्या काळात धर्मांध शक्ती तोंड वर काढतातअश्या वेळी प्रा.पवार सरांनी वाढदिवसाच्या निमित्ताने समाज प्रबोधन करण्याचा विचार केला असा वाढदिवस मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहत आहे.इथल्या उपस्थितीचा
मला सार्थ अभिमान आहे. आपण लोकशाहीचा जागर सुरू ठेवू.आजची न्याय व्यवस्था, नोकरशाही याचा विचार करावा पुरोगामी विचारांची लढाई पुढे सुरू ठेवावी लागणार आहे.आजचे सत्कार मुर्ती प्रा.अशोक पवार सर यांनी विचार मांडताना आपल्या सर्वांना पुरोगामी विचारांचा प्रसार, प्रचार करण्याची गरज आहे म्हणून हा सर्व खटाटोप.माझे उर्वरित आयुष्य हे प्रश्न विचारणार्या पिढीच्या अर्पण केले आहे. आजचे नेते सांगतात गरीबांना माझ्या कडे आणू नका .आजच्या दादा खूप दादागिरी करतात ती आता खपवून घेणार नाही.” मै गरीब हुँ मगर किस्मत का मारा नहीं हुँ.आपण पुरोगामी विचारांचा वारसा जपणारी पिढी तयार करायची आहे. आज वाढदिवसाच्या निमित्ताने हाच संकल्प करतो.मा.खा.उन्मेष पाटील यांनी विचार मांडताना आजचे सत्कार मुर्ती रिटायर्ड असले तरी टायर्ड नाहीत. असे वाटते.संविधान आणि नितीमुल्य जपण्यासाठी प्रा.पवार सर अथक प्रयत्न करत आहेत.या वयात तरुणांना लाजवेल अस काम करतात याचा मला सार्थ अभिमान आहे. आपल्या विचार प्रबोधन अभियानातून तरुणांना नक्की च दिशा दर्शक ठरणार आहे. संविधान या विषयावर बोलताना मा.खा.उन्मेष पाटील यांनी सांगितले की देशाचे संविधान वाचवण्यासाठी सर्वांना प्रयत्न करणे आवश्यक आहे. आज हा ज्वलंत विषय चिंतनाचा आहे. अमळनेर नगरी हि पुरोगामी विचारांची भुमी आहे.हे तुमचे भाग्य समजतो. प्रा.पवार सरांचा वाढदिवस अशा पद्धतीने साजरा करतात याचा आपल्या सर्वांना अभिमानाचा विषय आहे. जनहिताचे काम करताना पाडळसरे धरण व्हावे. हि आमची दृढ ईच्छा आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ. लिलाधर पाटील यांनी केले. सुत्रसंचालन दयाराम पाटील यांनी केले,
मा.बन्सीलाल भागवत यांच्या मौर्य क्रांती संघाच्या सन्मान पत्राचे वाचन गौतम मोरे यांनी केले, आभार प्रदर्शन प्रा.डॉ. राहुल निकम यांनी केले. कु.विधी पाटील,कु.चार्वी पवार यांनी सहभाग घेतला.कार्यक्रमास बहुजन समाजातील नेते, कार्यकर्ते,युवा मित्र उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page