अमळनेर (प्रतिनिधी ) – येथील दि अमळनेर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक संचालक मंडळाच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांचे स्वागत बँक समोर करण्यात आले. तर बँकेच्या शतक महोत्सवासाठी आमंत्रित करण्यात आले.
अमळनेर अर्बन बँकेचे चेअरमन पंकज मुंडे व व्हाईस चेअरमन रणजित शिंदे यांनी उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.यावेळी अमळनेर अर्बन बँकेला शंभर वर्ष पूर्ण होत असल्याने शतक महोत्सवाच्या कार्यक्रमाला दादांनी उपस्थित रहावे. यासाठी बँकेतर्फे विनंतीपूर्वक आमंत्रण देण्यात आले.
शतक महोत्सवाला अवश्य उपस्थित राहील असे ना. अजित पवार यांनी यावेळी सांगितले. यावेळी ना. पवारांसोबत ना.अनिल पाटील,खा.सुनिल तटकरे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणक रथावर उपस्थित होते. बँकेच्या संचालक मंडळातील जेष्ठ संचालक मोहन सातपुते, प्रदिप अग्रवाल,भरत ललवाणी, अभिषेक पाटील,प्रविण पाटील,जेष्ठ संचालक प्रविण जैन, लक्ष्मण महाजन,सौ.वसुंधरा लांडगे, डॉ. मनिषा लाठी, बँकेचे व्यवस्थापक अमृत पाटील आदींसह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रयतसंदेश न्युज नेटवर्क :- अमळनेर-मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त झाल्याने राष्ट्रवादी अजित पवार…
रयतसंदेश न्युज नेटवर्क:- अमळनेर (प्रतिनिधी ):- कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय, मारवड येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने…