अमळनेर(प्रतिनिधी) – राजमाता,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी च्या कार्यक्रमा प्रसंगी सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विठ्ठलराव बोरसे माजी अध्यक्ष अहिल्यादेवी विद्या प्रसारक मंडळ बोर्डिंग जळगाव हे होते .तसेच याप्रसंगी प्रमुख मान्यवरांचे शाल व बुके देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी बुद्धी, साहस आणि चातुर्याच्या जोरावर तीस वर्ष न्यायाचे राज्य केले. मानवतावादी दृष्टिकोन ठेवून समाजात एकात्मता निर्माण केली. अशा कर्तुत्वान राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य घराघरात पोहोचवा असे आवाहन मौर्य क्रांती संघाचे महाराष्ट्राचे प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब बन्सीलाल भागवत यांनी केले. लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रमाचे आयोजन कॉटन मार्केट सभागृह अमळनेर येथे करण्यात आले होते .याप्रसंगी प्राध्यापक अशोक पवार सर यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या 300 व्या पुण्यतिथी निमित्त तीनशे वक्ते जळगाव जिल्ह्यात निर्माण करण्याचा संकल्प केला. तर संदीप घोरपडे सर यांनी अहिल्याबाई होळकरांचे न्यायव्यवस्थेबाबत 50 ठिकाणे व्याख्याने देण्याचा संकल्प केला. दर्शना पवार मॅडम यांनी अहिल्यादेवींच्या नावे 300 झाडे साने गुरुजी स्मारक उद्यान्यात लावून अहिल्यादेवी चे गार्डन निर्माण करण्याचा संकल्प सोडला .पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जीवन कार्यावर तसेच विविध उपक्रम कसे राबवता येतील की ज्याच्यामुळे समाजाची प्रगती व विकास कसा होईल याबद्दल खालील मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले .
प्राध्यापक सुभाष सुकलाल पाटील संचालक -कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर, मौलाना रियाज भाई शेख संचालक -अल्लामा खैराबादी स्टडी सेंटर अमळनेर, रवींद्र लाळगे जिल्हाध्यक्ष -मौर्य क्रांती संघ, रामचंद्र भालेराव उपजिल्हाध्यक्ष -मौर्य क्रांती संघ, दयाराम पाटील सर, सोपान भवरे सर आदींनी आपले विचार व्यक्त केले .*याप्रसंगी अण्णासाहेब बन्सीलाल भागवत प्रदेश उपाध्यक्ष- मौर्य क्रांती संघ ,भाऊसो समाधान धनगर संचालक- कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर ,आबासो नितीन निळे माजी सभापती ‘न . पा .शिक्षण मंडळ अमळनेर, एस सी तेले सर तालुकाध्यक्ष -राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भटक्या विमुक्त सेल ,आबासो हरचंद लांडगे माजी शहराध्यक्ष भारतीय जनता पार्टी, मच्छिंद्र लांडगे तालुकाध्यक्ष- धनगर महासंघ ,रमेश देव शिरसाट उपजिल्हाध्यक्ष- मौर्य क्रांती संघ ,गोपीचंद दादा शिरसाठ तालुका अध्यक्ष-मौर्य क्रांती संघ,प्रभाकर लांडगे सामाजिक कार्यकर्ते ,प्रदीप भाऊ कंखरे संचालक- कृषी अग्रो अमळनेर ,अजय भामरे संपादक- लेखन मंच साप्ताहिक ,संजय सूर्यवंशी जिल्हाध्यक्ष- इलेक्ट्रिक मीडिया, दिलीप ठाकरे माजी सरपंच धानोरा ,पी वाय पाटील,संजय शिरसाठ, भाऊलाल पाटील, संदीप जैन ,दिलीप खांडेकर मोतीलाल जाधव,पवार सर, देविदास हटकर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस सी तेले यांनी केले .आभार प्रदर्शन गोपीचंद शिरसाट यांनी केले*.