रयतसंदेश न्युज नेटवर्क :-
अमळनेर (प्रतिनिधी) – ग्रामविकास शिक्षण मंडळ संचलित कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने सद्भावना दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देसले यांनी भुषविले. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.सतिश पारधी यांनी कार्यक्रमाची रूपरेषा मांडली. महाविद्यालयाचे प्राचार्य आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.वसंत देसले यांनी राजीव गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन केले. सर्व उपस्थित प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सद्भावना दिवसाची प्रतिज्ञा घेतली.
अध्यक्षीय भाषणात डॉ. वसंत देसले यांनी राजीव गांधी यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. भारतीय तंत्रज्ञान क्षेत्रात मोलाची भूमिका राजीव गांधी यांची असून संगणकामुळे देशाच्या विकासाला गती मिळेल म्हणून संगणक क्षेत्रात प्रगती केली. याचा फायदा आजच्या तरुणांना होत आहे. राजीव गांधी भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान होते. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आज सॉफ्टवेअर क्षेत्रात देखील उल्लेखनीय प्रगती देशाने केली आहे. राष्ट्रीय एकता टिकून राहावी यासाठी सद्भावना दिवस साजरा केला जात असल्याचे आपल्या मनोगतातून सांगितले.
कार्यक्रमाचे आभार प्रा. डॉ . दिलीप कदम यांनी मानले.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. सतिश पारधी, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. नंदा कंधारे, प्रा. विजय पाटील, प्रा डॉ. देवदत्त पाटील,विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. जितेंद्र माळी, प्रा.डॉ. दिलीप कदम, प्रा.डॉ. माधव वाघमारे,प्रा. डॉ. संजय पाटील, श्री. जगदीश साळुंखे,श्री. सचिन पाटील, श्रीमती मंजुषा गरूड, श्री . दिलीप चव्हाण, श्री.अतुल साळुंखे, श्री. शामकांत पाटील, श्री. दिपक पाटील,श्री. सचिन साळुंखे आणि विद्यार्थी उपस्थित होते.