अमळनेर रयतसंदेश न्युज :-
अमळनेर(प्रतिनिधी) सिन्नर येथे गंगागिरी महाराज संस्थान गोदावरी धाम बेट सरला येथील मठाधिपती रामगिरी महाराजांनी सिन्नर येथे संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देणारे मोहम्मद पैगंबर यांच्या विषयी तसेच समस्त मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या जातील अशा पद्धतीचे आपत्तीजनक व दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होऊन दंगे होतील अशी परिस्थिती निर्माण करण्यासाठी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ तसेच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन युवक काँग्रेसच्या वतीने पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक मा. विकास देवरे साहेब यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले यावेळी संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी व सामाजिक शांतता आबाधित रहावी यासाठी पोलीस प्रशासनाने सावधपणे पावले उचलून संबंधितांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी युवक काँग्रेसने केली
युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अजहर अली सय्यद यांच्यासह काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ बोरसे, जिल्हा सरचिटणीस संदीप घोरपडे, अमळनेर काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोज पाटील, अमळनेर काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष असिफ बागवान, जळगाव जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेश पाटील, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव तुषार संदानशिव, काँग्रेसचे कायदेशीर सल्लागार अॅड प्रशांत संदानशिव, रफीक हाजी, फिरोज पठाण, अब्दुल रज्जाक शेख कादर,असीफ शेख, रेयान पठान आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.