होमगार्डमधील विविध पथकांच्या ठिकाणी रिक्त असलेल्या ३२५ नविन होमगार्ड सदस्य नोंदणी

रयतसंदेश न्युज नेटवर्क :-

अमळनेर (प्रतिनिधी) : जिल्हा
होमगार्डमधील विविध पथकांच्या ठिकाणी रिक्त असलेल्या ३२५ नविन होमगार्ड सदस्य नोंदणी करण्याचे आयोजन केलेले आहे. या करीता दि. २५ जुलै ते १४ ऑगस्टदरम्यान ऑनलाईन २१ हजार २३४ अर्ज प्राप्त झालेले आहेत.
त्यानुसार नोंदणी झालेल्या उमेदवारांची कागदपत्र तपासणी व मैदाणी चाचणी पुढील गुरुवारी २९ ऑगस्टपासून ३ सप्टेंबर पर्यंत दिलेल्या तारखेत घेण्यांत येत आहे.

या बाबत विस्तृत माहिती https://maharashtracdhg. gov.in/mahahg/enrollmen tadd.php या संकेत स्थळावरसुध्दा उपलब्ध आहे. तरी होमगार्ड मध्ये नोंदणी केलेल्या
उमेदवारांनी दिलेल्या तारखे वेळी व ठिकाणी नोंदणी अर्ज, २ पासपोर्ट फोटो, मुळ कागदपत्र व छायांकित प्रतीसह उपस्थित रहावे असे आवाहन करण्यांत येत आहे.

सदरची नोंदणी फक्त जळगांव जिल्हयासाठीच आहे. बाहेरील जिल्हयातील नोंदणी झालेले अर्ज व अनुशेष नसलेल्या ठिकाणी करण्यांत आलेले अर्ज बाद करण्यांत आलेले आहे. अश्या उमेदवारांनी उपस्थित राहू नये याची नोंद घ्यावी असे आवाहन जिल्हा समादेशक, होमगार्ड तथा अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते साहेब यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page