रयतसंदेश न्युज नेटवर्क :-
अमळनेर ( प्रतिनिधी):- अमळनेरचे माजी आमदार व खानदेश ची मुलुख मैदान तोफ म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जाणारे “साथी गुलाबराव पाटील यांच्या पहिल्या स्मृती समारोह निमित्ताने पुरस्कार आणि वक्तृत्व स्पर्धा चे आयोजनात पहिला “सामाजिक पुरस्कार” धुळे येथील राजेंद्र छत्रालयाचे प्राचार्य मधुकर भोजू शिरसाठ यांना जाहीर झाला आहे, सदर पुरस्कार पदमंश्री कांतिभाई शहा ,संस्थापक अध्यक्ष युवक बिरादरी, मुंबई यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे तर “साथी गुलाबराव पाटील राजकिय (पुरोगामी )पुरस्कार”नागपूर जिल्ह्यातील खुर्सापूर येथील प्रा. सुधीर गोतमारे याना जाहीर झाला आहे सदर पुरस्कार संस्थापक शिक्षक भारती मुंबई चे कपिल पाटील यांच्या हस्ते दिला जाणार आहे , अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळा च्या वतीने दिले जाणारे हे राज्यस्तरीय पुरस्कार असून, 24 ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज नाट्य गृहात प्रदान केले जाणार आहेत, तर साथी गुलाबराव पाटील यांच्या पहिल्या स्मृती दिना निमित्त 22 ऑगस्ट रोजी साने गुरुजी विद्यालयात नूतन इमारतीचे भूमिपूजन व अतिरिक्त जलकुंभाचे उदघाटन केले जाणार आहे तर 23 ऑगस्ट रोजी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, 22 ते 24 ऑगस्ट दरम्यान शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात , वैचारिक मेजवानी चे आयोजन, अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळातर्फे करण्यात आल्याने त्याचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थेचे सचिव मा.संदिप घोरपडे आणि अध्यक्ष मा.हेमकांत पाटील, व संचालक मंडळाने केले आहे.