*आज दिनांक 4 जानेवारी 2024 रोजी गटसाधन केंद्र पंचायत समिती अमळनेर येथे”ब्रेल लिपीचे जनक लुईस ब्रेल” यांच्या जयंती निमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले.* *प्रतिमा पूजन ढेकु केंद्राचे केंद्र प्रमुख श्री. दिलीप सोनवणे सर यांच्या हस्ते करण्यात आले. सोबत तालुका समन्वयक राहुल चौधरी, विशेष शिक्षक किशोर पाटील, अमोल पाटील, हंसराज पाटील, महेंद्र पाटील,मोहन मराठे ,शितल भदाणे, रेखा वारडे, सुनिता पाटील,सोनाली पिंगळे विषय तज्ञ तुषार बाविस्कर, देवेंद्र पाटील, प्रमोद पाटील आदी उपस्थित होते.*
*4 जानेवारी ही तारीख देशाच्या आणि जगाच्या इतिहासात काही खास कारणांमुळे नोंदली जाते.अंधासाठी वाचनाचा मार्ग मोकळा करणाऱ्या लुई ब्रेल यांच्या जयंतीनिमित्त ही तारीख स्मरणात ठेवली जाते लुई बेल यांचा जन्म 4 जानेवारी 1809 रोजी फ्रान्समधील कुप्रे या छोट्याशा गावात झाला. लुई ब्रेल यांनी अंधासाठी लिपी शोधून काढली म्हणून ओळखली जाते.*