रयतसंदेश न्युज नेटवर्क :-
अमळनेर (प्रतिनिधी )- अमळनेरातील विविध कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या समवेत आदरणीय पवार साहेबांची भेट घेऊन पक्षाकडे उमेदवारी मागणी अर्ज दाखल करण्यापूर्वी आशीर्वाद घेतले.
त्यासोबतच आदरणिय सुप्रिया ताई आणि जयंत पाटील साहेब यांची देखील सदिच्छा भेट घेतली. व पक्ष सरचिटणीस श्री. रवींद्र पवार साहेब यांच्याकडे माझा उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी नूतन शहर कार्याध्यक्ष प्रवीण देशमुख व नूतन युवक तालुका अध्यक्ष परेश शिंदे यांचे पवार साहेब, सुप्रिया ताई आणि जयंत पाटील साहेबांनी अभिनंदन केले.
प्रसंगी अमळनेर शहर अध्यक्ष श्याम पाटील, नूतन शहर कार्याध्यक्ष प्रवीण देशमुख, नूतन युवक तालुका अध्यक्ष परेश शिंदे, डॉ. प्रशांत शिंदे, माजी सरपंच गोवर्धन शाम पाटील, राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस वेदांशू पाटील, शुभम सोनावणे, मयूर पाटील, अक्षय चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.