रयतसंदेश न्युज नेटवर्क:-
अमळनेर ( प्रतिनिधी )- चोपडा तालुक्यात 13 वर्षीय आदिवासी चिमुरडीवर अत्याचार करून निर्दयीपणे तिची हत्या करण्यात आल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. या अमानवीय कृत्याने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या महाविकास आघाडीने कठोर प्रतिक्रिया देत, सदर आरोपीस फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे.
महाविकास आघाडीच्या वतीने चोपडा तहसीलदारांना निवेदन देण्यात आले, ज्यामध्ये या अमानवीय प्रवृत्तीच्या नाराधमांवर वचक बसवण्यासाठी कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. या निवेदन प्रसंगी महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते व अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आणि सरकारने त्वरित आरोपीस कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी केली.