रयतसंदेश न्युज नेटवर्क :-
अमळनेर (प्रतिनिधी ) – सकल धनगर समाज व राष्ट्रवादी काँग्रेस भटक्या विमुक्त सेल तर्फे धनगर समाजातील श्रावण बाळ योजना, संजय गांधी निराधार योजना,विधवा निराधार योजना, ज्येष्ठ नागरिक,लाडकी बहीण योजना तसेच पुरवठा विभागातील शिधापत्रिका, दुय्यम शिधापत्रिकेत नाव वाढविणे ,कमी करणे अशा शासनाच्या असलेल्या विविध योजनांची लवकर अंमलबजावणी करण्या बाबतीत माननीय तहसीलदार रुपेश कुमार सुराणा साहेब यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस भटक्या विमुक्त सेलचे तालुकाध्यक्ष एस .सी .तेले , मौर्य क्रांती संघ प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब बन्सीलाल भागवत ,धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते आबासाहेब हरचंद लांडगे, सेवानिवृत्त पी.आय. हिरामण कंखरे साहेब, मौर्य क्रांती तालुकाध्यक्ष दादासो गोपीचंद शिरसाट, मौर्य क्रांती संघ जिल्हा उपाध्यक्ष रमेश देव शिरसाठ ,समाधान कंखरे सर, कवी शरद धनगर, माजी सरपंच दिलीप ठाकरे ,विकास सूर्यवंशी, माजी सरपंच प्रकाश मनोरे धनराज शिरसाठ आदींच्या सह्या आहेत.