अमळनेर नगर परिषद हद्दीतील मुंदडानगर लगतच्या *ओम शांती नगर येथील खुला भूखंड गट क्र.१४३७ वरील नगर परिषद निधीतून होणार्या ग्राउंड काँक्रिटीकरण, वायर फिनिशिंग वॉल कंपाऊंड व जॉगिंग ट्रॅक कामाचे भूमिपूजन मा.ना.श्री.अनिलदादा पाटील ( मंत्री- मदत व पुनर्वसन, महाराष्ट्र राज्य) यांचे शुभ हस्ते करण्यात आले*.
अमळनेर प्रतिनिधी :- बापूराव ठाकरे.
ओम शांती नगर भागातील स्थानिक नागरिक नवरात्रि मध्ये मोठ्या उत्सवांने सालाबादाप्रमाणे उत्सव याठिकाणी साजरा करतात त्यांच्या मागणीनुसार सदरच्या *कामांसाठी माजी नगरसेवक प्रताप आबा शिंपी यांनी पाठपुरावा करून काम मंजूर करण्यात आले होते. याकामी मुख्याधिकारी डॉ प्रशांत सरोदे, विक्रांत भास्करराव पाटील, विक्की आबा जाधव यांचे सहकार्य मिळाले.*
भूमिपूजन कार्यक्रमास अनिल शिसोदे,एल. टि.नाना पाटील, बाळू पाटील, गौरव पाटील, यांचेसह लहू पाटील,भरत ठेकेदार, गुलाब गायकवाड, विलास आप्पा,श्रीराम मराठे, नवल पाटील, शांताराम पाटील व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते…!