रयतसंदेश न्युज नेटवर्क :-
अमळनेर (प्रतिनिधी ) :- नाशिक जनकल्याण सामाजिक संस्थेच्या वतीने कोल्हापूर येथे बॉश सेवानिवृत्तकल्याण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष व नाशिक जिल्हा पेन्शन फेडरेशनचे कार्याध्यक्ष चेतन पणेर यांना छ. शाहू महाराज समाज गौरवहा मानाचा पुरस्कार मान्यवरांचेहस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.दरम्यान काल कोल्हापूर
असोसिएशन हॉल तेथे झालेल्या शानदार समारंभात मां.मंत्री महाराष्ट्र मां. भरमू आण्णा पाटिल यांचें हस्ते नाशिकचे ज्येष्ट समाज कार्यकर्ते चेतन पणेर याना स्मृती चिन्ह, सन्मान पत्र व कोल्हापुरी फेटा देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी व्यासपीठावर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, सस्थेचे अध्यक्ष उदयसिंह पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
चेतन पणेर यांच्या भटके विमुक्त, मागास प्रवर्गातील विशेष प्रदीर्घ नेतृत्व व कामगार, ज्येष्ट नागरिक,सामाजिक क्षेत्रातील ४० वर्ष कार्य बघून हा मानाचा छ. शाहू महाराज समाज गौरव पुरस्कार देण्यात आला आहे.त्यांना मागासवर्ग कार्याबद्दल महाराष्ट्र शासनानेडॉ.आंबेडकरसमाज भूषण पुरस्कार हि दिलेला होता.पणेर यांच्या या विशेष बहुमान पुरस्काराबद्दल मागास वर्गातील तसेच कामगार,पेन्शन सामाजिक
राजकीय संस्थेच्या मान्यवरांनी
अभिनंदन केले आहे.