व्हॉईस ऑफ मीडियाच्या पाठ पुराव्यामुळे साप्ताहिक आणि ‘ क ‘ दर्जाच्या वृत्तपत्रांना शासनाच्या जाहिराती

रयतसंदेश न्युज नेटवर्क :-

अमळनेर ( प्रतिनिधी ) देशातील सर्वात मोठ्या व क्रमांकाची एक ची पत्रकार संघटना अर्थात व्हॉईस ऑफ मीडियाने साप्ताहिके व ‘ क ‘ दर्जाच्या वृत्तपत्रांना शासकीय जाहिराती मिळाव्यात यासाठी वारंवार धरणे, आंदोलने , पत्रव्यवहार तसेच संबंधित मंत्री व अधिकारी यांच्या भेटीगाठी घेऊन हा प्रश्न ऐरणीवर आणला होता. त्यास आता मोठे यश लाभले आहे. याबाबत राज्यातील माहिती व जनसंपर्क महासंचालनालय विभागीय माहिती कार्यालय यांनी सर्व दैनिके व साप्ताहिके यातील जाहिरात व्यवस्थापकांना 3 ऑक्टोबर रोजी पत्र पाठवून खुलासा केला आहे. पत्रात म्हटले आहे की, २०२४-२५ या आर्थिक वर्षात विशेष प्रसिद्धी मोहिमेअंतर्गत शासकीय मान्यता यादीवरील लघु व मध्यम वर्गाच्या सर्व दैनिकात व साप्ताहिकांमधून पान क्रमांक तीनवर २५ टक्के अतिरिक्त दराने जाहिरात प्रसिद्ध करावी. याबाबत त्यांनी वरिष्ठ सहाय्यक संचालक जाहिरात व प्रशासन यांनी दिलेला पत्राचा संदर्भही दिला आहे. पत्रात म्हटले आहे की ,२०२४-२५ या आर्थिक वर्षात विशेष प्रसिद्धी मोहिमेंतर्गत राज्यातील शासनमान्य यादीवरील मध्यमवर्गाच्या सर्व दैनिकात व साप्ताहिकात रंगीत ८०० सेमी तर लघु वर्गाच्या सर्व दैनिके व साप्ताहिकात कृष्णधवल ८०० सेमी आकाराची जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी.

दैनिकांनी दिनांक ४ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करावी . साप्ताहिकांसाठी प्रसिद्धीचा कालावधी ४ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर असा राहील. जिल्हा माहिती अधिकारी यांच्या नावे देयक संदर्भ देऊन तयार करावे. देवकांमध्ये जाहिरातीचा आदेश क्रमांक व दिनांक यांचा स्पष्ट उल्लेख असावा .आदेशाची झेरॉक्स प्रत सोबत जोडण्यात यावी. देयकाची जाहिरात प्रसिद्ध झालेल्या अंकासह देयक जिल्हा माहिती अधिकारी यांच्या पत्त्यावर पाठवावे. देयकाची तिसरी प्रत जाहिरात प्रसिद्ध केलेल्या अंकासह तातडीने जिल्हा उपसंचालक, विभागीय माहिती कार्यालयाकडे पाठवावी. दरम्यान हे पत्र सोशल मीडियावर झळकल्या बरोबर राज्यातील अनेक साप्ताहिके व ‘ क ‘ दर्जाच्या वृत्तपत्राच्या संपादकांनी व्हॉईस ऑफ मीडियाचे राज्यातील पदाधिकारी व साप्ताहिक विंगच्या पदाधिकाऱ्यांना अभिनंदन व आभाराचे फोन आणि मेसेज करून ऋणभाव व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page