मारवड महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन*

रयतसंदेश न्युज नेटवर्क :-

अमळनेर (प्रतिनिधी)- ग्रामविकास शिक्षण मंडळ संचलित कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ग्राम विकास शिक्षण मंडळाचे संचालक भैय्यासाहेब दिनेश वासुदेव साळुंखे यांनी भुषविले. व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंत देसले, उपप्राचार्य प्रा.व्ही.डी. पाटील, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ .जितेंद्र माळी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.सतिश पारधी यांनी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष भैय्यासाहेब. दिनेश वासुदेव साळुंखे, कार्यक्रमाला उपस्थित प्राचार्य डॉ.वसंत देसले, उपप्राचार्य प्रा.व्ही.डी. पाटील यांच्या हस्ते महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. सतिश पारधी यांनी 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2024 या कालावधीत स्वच्छता ही सेवा या उपक्रमाअंतर्गत केलेल्या विविध कामाविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या उपक्रमांतर्गत गावातील हनुमान मंदिर परिसर, पोलीस स्टेशन परिसर, ग्रामपंचायत परिसर, शहीद जवान परिसर, बस स्टॉप परिसर स्वच्छ करण्यात आला. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी लोकांशी संवाद साधत स्वच्छता ही सेवा या अभियानाविषयी माहिती देत लोकांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले.
उपक्रमांतर्गत महाविद्यालयाचा परिसर स्वच्छ करण्यात आला. प्रत्येकाने आपलं घर,आपला परिसर,आपले गाव स्वच्छ करण्याचा निर्धार केला. स्वच्छता ही सेवा या उपक्रमामध्ये सहभागी स्वयंसेवकांनी स्वच्छतेविषयी आपले मत मांडले. स्वच्छता ही सेवा महात्मा गांधीजींनी दिलेल्या संदेशाची अंमलबजावणी विद्यार्थी जीवनापासून व्हावी म्हणून विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली व प्लास्टिक मुक्त अभियान, स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
नाजमीन पठाण विद्यार्थीनीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. कोमल पाटील या विद्यार्थिनीने महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या विचारांची गरज समाजाला असल्याचे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष भैय्यासाहेब दिनेश वासुदेव साळुंखे यांनी महात्मा गांधी यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील विविध चळवळींचा उल्लेख केला. स्वच्छता ही सेवा या उपक्रमाच्या अंतर्गत महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी जे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले त्याबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यार्थी जीवनापासूनच स्वच्छता ही सेवा अंगीकारली पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. गांधी विचार संस्कार परीक्षेत सलग दोन वर्ष सुवर्णपदक मिळवलेल्या कु.नाजमिन पठाण हिचा सत्कार भैयासाहेब दिनेश वासुदेव साळुंखे यांनी केला.
कार्यक्रमाचे आभार विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ . जितेंद्र माळी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. सतिश पारधी, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. नंदा कंधारे, प्रा.विजय पाटील,प्रा.डॉ. दिलीप कदम, प्रा.डॉ. माधव वाघमारे, प्रा.डॉ.पवन पाटील, प्रा. डॉ.संजय पाटील, प्रा.डॉ. संजय महाजन, श्री. सचिन पाटील, श्री. जगदीश साळुंखे, श्रीमती मंजुषा गरूड, श्री.सचिन साळुंखे, श्री. दिलीप चव्हाण, श्री. दिपक पाटील,श्री. अतुल साळुंखे, श्री. शाम पाटील व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page