रयतसंदेश न्युज नेटवर्क:-
अमळनेर( प्रतिनिधी) :-
साळवे विद्यालयात डॉ ए पी जे अब्दुल कलाम, माजी राष्ट्रपती यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिवसाच्या कार्यक्रमात विज्ञान शिक्षिका गुणवंती पाटील यांनी भारतरत्न कलामांचे जीवन चरित्र थोडक्यात स्पष्ट करून सांगितले. नंतर ज्येष्ठ शिक्षिका रंजना नेहेते यांनी जागतिक हात धुवा दिनानिमित्त स्वच्छ भारत मिशन (ग्रामिण) अंतर्गत जागतिक हात धुवा दिनानिमित्त अन्न स्वच्छता, हात धुण्याच्या महत्त्वाच्या वेळा याची माहिती दिली आणि सदर प्रसंगी विद्यार्थ्यांना साबणाने हात धुण्याचे प्रात्यक्षिके करून दाखवले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक एस डी मोरे यांनी हात धुण्याच्या पद्धती, हात धुण्याचे फायदे आणि स्वच्छतेचे महत्व पटवून दिले व विद्यार्थ्यांना गावात गल्ली-गल्लीत सामुदायिक बैठका घेऊन पालकांचा सहभाग व नागरिकांना मार्गदर्शन करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी आर बोरोले यांनी केले. आभार प्रदर्शन जी व्ही नारखेडे यांनी केले. याप्रसंगी नीता पाटील, प्रतिभा पाटील, वर्षा नेहेते, पौर्णिमा वारके, दिगंबर पाटील, व्ही के मोरे, एस पी तायडे, एस व्ही राठोड, व्ही एस कायंदे व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.