रथ, वहनोत्सवात पोलिस व सफाई कर्मचाऱ्यांचे बहुमूल्य योगदान; प्रा.डी आर पाटील

रयतसंदेश न्युज नेटवर्क :-

अमळनेर (प्रतिनिधी) –

धरणगाव येथील श्री.बालाजी वहन व्यवस्थापक मंडळातर्फे रथ, वहनोत्सव दरम्यान व धरणगाव शहर परिसरात कायदा सुव्यवस्था अबाधित राखत तब्बल सात वर्ष कर्तव्य बजावण्यात व उत्कृष्ट सेवा देणारे पोलिस कर्मचारी पोहेकॉ. मिलिंद सोनार व पोकॉ. विनोद संदानशिव यांसह नगर परिषदेचे सफाई कर्मचारी गणेश करोसिया व विजय पचेरवार यांनी उत्तम सेवा दिल्याबद्दल श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला. याप्रसंगी मंडळाचे श्री.बालाजी वहन व्यवस्थापक मंडळाचे अध्यक्ष प्रा. डी आर पाटील म्हणाले की, धरणगाव शहराची दीड शतकाची गौरवांकित परंपरा लाभलेल्या श्री. बालाजी रथ, वहनोत्सव तब्बल पंधरा दिवस भक्ती भावात व मोठ्या उत्साहात साजरा होत असतो, रथ-वहनोत्सव दरम्यान जीवाची पर्वा न करता, कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी रात्रंदिन एक करणारे पोलीस कर्मचारी व स्वच्छतेच्या कामात स्वच्छतादूत म्हणून कार्य करणारे सफाई कर्मचाऱ्यांप्रती पोलिस बांधव व सफाई कर्मचारी बांधव यांचे बहुमूल्य योगदानाबद्दल कृतज्ञता म्हणून आपणही त्यांचे काही देणं लागतो ह्या हेतूने बालाजी व्यवस्थापक मंडळातर्फे पोलिस नाईक मिलिंद सोनार व विनोद संदानशिव यांच्या हस्ते सफाई कर्मचारी गणेश करोसिया व विजय पचेरवार यांचा सन्मान याप्रसंगी करण्यात आल्याचे अध्यक्ष प्रा.पाटील यांनी सांगितले. तद्नंतर पोलिस कर्मचारी मिलिंद सोनार व विनोद संदानशिव यांनी आभाराप्रती व्यक्त झाले की, श्री. बालाजी वहन मंडळाने दिलेला सन्मान आमच्यासाठी आम्ही दिलेले सेवेचे मोठ्ठे प्रमाणपत्र आहे, व आमच्यासाठी पोलिस सेवेत प्रेरणा देणारे असून यापुढे देखील कायदा सुव्यवस्था बळकटीसाठी अधिक जोमाने सेवा देण्याचा प्रयत्न करणार असेही श्री. सोनार व संदानशिव यांनी सांगितले. यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष गुलाबराव वाघ, कार्याध्यक्ष जीवनसिंह बयस, सचिव प्रशांत वाणी, खजिनदार किरण वाणी, सहसचिव अशोक येवले, सदस्य महेंद्र बयस, सुनील चौधरी, अरुण महाले, किशोर वाणी, संतोष सोनवणे, नामदेव चौधरी, अनिल वाणी आदींसह ज्येष्ठ पत्रकार ॲड. व्ही एस भोलाणे, कडू महाजन, राजेंद्र वाघ, निलेश पवार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page