रयतसंदेश न्यूज नेटवर्क:-
अमळनेर:- अमळनेर तालुक्यात युवा पिढीच्या उज्ज्वल भविष्याचा विचार करून ना अनिल पाटील यांनी एक नवा उपक्रम सुरू केला असून तरुणाईला स्पर्धा परीक्षा आणि इतर अभ्यासक्रमांच्या पुस्तकांचे वाटप करण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त वेळ अभ्यासात घालवून यश प्राप्त करून आपले उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी मदत होईल असा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेऊन ना. अनिल पाटील यांनी विद्यार्थ्यांना पुस्तके पुरवली याउलट इतर उमेदवार तालुक्यातील तरुण विद्यार्थ्यांना बोटी, आणि बाटली देऊन तरुणाईला व्यसनाच्या नादी लावत आहेत. माथी भडकावून तरुणांना दिशाहीन करण्याचा प्रयत्न केला जात असल्याबाबत जोरदार चर्चा चालू असून अशा नेतृत्वाला तालुक्यातील तरुणाई तसेच सुज्ञ जनता थारा देणार नाही असा तालुका वासियांना ठाम विश्वास असल्याचे राकेश पाटील मंगरूळ यांनी सांगितले आहे.