रयतसंदेश न्यूज नेटवर्क:-
६ नोव्हेंबर 2024 रोजी भव्य कार्यक्रम
अमळनेर ( प्रतिनिधी)-
राज्यातील वाचक आणि जाहिरातदार यांचे आवडते न्यूज वेब पोर्टल “मराठी लाईव्ह न्युज” च्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त “कर्तृत्व गौरव पुरस्कार 2024” आयोजित करण्यात आला आहे. या विशेष सोहळ्यात विविध क्षेत्रातील 10 मान्यवरांना दिग्गजांच्या शुभहस्ते सन्मानपत्र, शाल, स्मृतिचिन्ह आणि गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून व्हाईस ऑफ मीडिया महाराष्ट्र राज्याचे प्रदेश सरचिटणीस आणि ज्येष्ठ पत्रकार, डॉ. डिगंबर महाले उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून आदिवासी विकास महामंडळ नाशिकचे उपायुक्त कपिलजी पवार, सेवानिवृत्त डीवायएसपी सुनील नंदवाडकर, नोबेल फाउंडेशन जळगावचे अध्यक्ष डॉ. जयदीप पाटील, देवगाव देवळी हायस्कूलचे अध्यक्ष विलासराव पाटील, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. वा. ना. आंधळे, सेवानिवृत्त उपप्राचार्य प्रा. डॉ. एस. ओ. माळी, आणि मराठी वाड्:मय मंडळाचे उपाध्यक्ष श्यामकांत भदाणे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
या अनोख्या कार्यक्रमात सर्व पुरस्कार प्राप्त करणाऱ्या बंधू भगिनींना सहकुटुंब आणि सहपरिवार उपस्थित राहण्याचे आवाहन “मराठी लाईव्ह न्युज”चे मुख्य संपादक ईश्वर महाजन यांनी केले आहे.
**”कर्तृत्व गौरव पुरस्कार २०२४” मानकरी:**
1. मंगळ ग्रह सेवा संस्था, अमळनेर –
क्षेत्र-अध्यात्मिक
2. मा. विजय पाटील,
स्वादिष्ट नमकीन, अमळनेर
क्षेत्र: युवा उद्योजक
3. प्रा. सुभाष सुकलाल पाटील,
शिरूड, ता. अमळनेर –
क्षेत्र: कृषी
4. डॉ. प्रशांत दिलीपराव शिंदे,
साई हॉस्पिटल, अमळनेर –
क्षेत्र: वैद्यकीय
5. सौ. सुषमा वासुदेव देसले पाटील,
(मा.लोकनियुक्त सरपंच)
दहिवद, ता. अमळनेर – क्षेत्र: सामाजिक व राजकीय
6. श्री शरद तुकाराम धनगर, करणखेडा, ता. अमळनेर, जि. जळगाव – क्षेत्र: साहित्य
7. श्री आर.आर. सोनवणे, बेटावद, ता. शिंदखेडा –
सेवानिवृत्त क्रीडा व विज्ञान शिक्षक
क्षेत्र-शैक्षणिक
8. श्री सुनील प्रभाकर वाघ, जी. एस. हायस्कूल, अमळनेर
– क्षेत्र: क्रीडा
9. सौ छाया संदीप पाटील,
(पोलीस पाटील)
पष्टाने, ता. धरणगाव
– क्षेत्र: सामाजिक
10. सागर सुखदेव कोळी, पाडळसे, ता. अमळनेर
क्षेत्र-युवा प्रेरणा पुरस्कार
सर्वांना या खास दिवशी सामील होण्यासाठी आमंत्रण!
भव्य सोहळा 6 नोव्हेंबर 2024, बुधवारी, सकाळी 10 वाजता जुना टाऊन हॉल, साने गुरुजी ग्रंथालय समोर होणार आहे. या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य अध्यक्ष व संचालक मंडळ व कर्मचारी पूज्य साने गुरुजी ग्रंथालय, मोफत वाचनालय, आणि संचालक साने गुरुजी स्पर्धा परीक्षा केंद्र, अमळनेर यांनी केले आहे.