रयतसंदेश न्युज नेटवर्क :-
अमळनेर (प्रतिनिधी):-
महाविकास आघाडीचे तसेच काँग्रेसचे अधिकृत उमेदवार डॉ.अनिल नथ्थू शिंदे यांनी आज उपविभागीय अधिकारी नितीन मुंडावरे यांच्या कडे उमेदवारी अर्ज सादर केला. अर्ज सादर करताना संत सखाराम महाराज वाडी येथे महाराजांचे आशीर्वाद घेऊन जैन मंदिर,सराफ बाजार, मांगीरबाबा दर्शन,पाच कंदील मार्ग, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, हुतात्मा चौक, समशेरसिंग पारधी स्मारक, सुभाष बाबू स्मारक ,साने गुरुजी स्मारक, स्वामीनारायण मंदिर, गौसे पाक दर्गा, बौद्ध विहार, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा,बळीराजा चौक,आणि शेवटी तहसील कचेरी या ठिकाणी एकत्र येऊन जोरदार शक्ती प्रदर्शन करत महाविकास आघाडीच्या वतीने उमेदवारीचा अर्ज दाखल केला. यावेळी डॉ. बी.एस.पाटील, तिलोत्तमाताई पाटील, अँड. ललिता पाटील,सुलोचनाताई वाघ, प्रा. सुभाष पाटील, सुरेश पाटील, श्याम पाटील, गोकुळ बोरसे, बी.के. सूर्यवंशी ,संदीप घोरपडे ,मनोज पाटील, सय्यद तेली, विजय मास्तर, पराग पाटील, कुणाल पाटील, सौ.कविता पवार ,सौ,रिटा बाविस्कर ,राजू शेख, अजहर अली सय्यद ,जुबेर पठाण ,मुन्ना शर्मा, धनगर पाटील ,संजय पुनाजी पाटील, शांताराम पाटील, योजना पाटील ,मनोहर निकम, दिनेश पवार, समाधान कंखरे ,मयूर पाटील, महेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार युवक तालुकाध्यक्ष परेश शिंदे,यांच्या सह महाविकास आघाडीच्या महिला व पुरुष ,कार्यकर्ते,समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.