अमळनेर विधानसभा मतदार संघात छानणीत चार अर्ज अवैध ठरले

रयतसंदेश न्यूज नेटवर्क :-

अमळनेर (प्रतिनिधी ) -विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी नितीन मुंडावरे यांनी केलेल्या छाननीत ,दोन उमेदवारांनी ए बी फॉर्म दिले नाही , १० प्रस्तावक दिले नाहीत , सक्षम प्राधिकरणासमक्ष प्रतिज्ञापत्र सादर केले नाही म्हणून चार उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र अवैध ठरवले आहेत.कैलास दयाराम पाटील यांनी इंडियन नॅशनल काँग्रेसचा एबी फॉर्म सादर न केल्याने त्यांचा पक्षाचा अर्ज अवैध ठरवण्यात आला तर अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज ग्राह्य धरण्यात आला आहे. तसेच जयश्री अनिल पाटील यांचाही नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी चा अर्ज अवैध ए बी फॉर्म नसल्याने अवैध ठरवण्यात आला आहे. मात्र अपक्ष अर्ज वैध ठरवण्यात आला आहे. महाराष्ट्र स्वराज्य पार्टी तर्फे अर्ज सादर करणाऱ्या प्रदीप किरण पाटील यांनी कलम ३३ प्रमाणे १० प्रस्तावक दिलेले नसल्याने व संगीता प्रमोद पाटील यांनी नमुना २६ प्रमाणे सक्षम प्राधिकारणासमोर शपथ प्रमाणपत्र केले नाही म्हणून अर्ज अवैध ठरवण्यात आला आहे. डॉ अनिल नथु शिंदे (इंडियन नॅशनल काँग्रेस) , अनिल भाईदास पाटील (अजीत पवार गट) , सचिन अशोक बाविस्कर (बहुजन समाज पार्टी ) , व अपक्ष म्हणून अनिल भाईदास पाटील,अमोल रमेश पाटील , अशोक लोटन पवार , छबिलाल लालचंद भिल , निंबा धुडकू पाटील ,प्रतिभा रवींद्र पाटील,प्रथमेश शिरीष चौधरी , यशवंत उदयसिंग मालचे , रतन भानू भिल, शिरीष हिरालाल चौधरी ,शिवाजी दौलत पाटील यांचे उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी नितीन मुंडावरे यांनी वैध ठरवले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page