अमळनेर तालुका व शहर काँग्रेस कार्यकारिणीची बैठक संपन्न.

रयतसंदेश न्युज अमळनेर:-

अमळनेर तालुका व शहर काँग्रेस कार्यकारिणीची बैठक दिनांक 11 जून 2024 रोजी सकाळी 10.00 वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह मधल्या संपर्क कार्यालयात संपन्न झाली. त्यात मा. जिल्हाध्यक्ष बाळासाहेब प्रदीप पवार यांच्या सूचनेनुसार, “मागील झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी त झालेल्या मत विभाजन” या विषयावर बोलताना तालुका अध्यक्ष श्री बी.के. सूर्यवंशी यांनी सांगितले की, जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, अमळनेर, पाचोरा चाळीसगाव व पारोळा येथे दोन मंत्री इतर चार ठिकाणी महायुतीचे आमदार, भाजपच्या अति दबावामुळे, कार्यरत झालेले होते. व त्यांनाही पुढे आमदारकीची निवडणूक लढवायची असल्याने, त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना चार्ज केले. तसेच (महायुतीच्या) तुलनेने अमळनेर तालुक्यात, महाविकास आघाडी चे बूथ लेवल कार्यकर्ते पूर्ण सक्रिय नव्हते. त्याचा परिणाम प्रत्यक्ष मतदानावर झाला. त्यामुळे शेतकरी समस्या, महागाई, बेरोजगारी, पक्ष फोडाफोडी,एडि, असले ठळक मुद्दे देखील अमळनेर तालुक्यात मतदाराचे मन वळवू शकले नाहीत.

त्यासाठी आजच्या साने गुरुजींच्या स्मृती दिवसाच्या निमित्ताने, ही बैठक घेऊन बूथ लेवल कार्यकर्ते वाढविणे, सक्रिय करणे, हे काम आगामी काळात करणे, व त्यासाठीचे वेळापत्रक तयार असल्याचे, सूर्यवंशी यांनी सांगितले. त्यानंतर श्री संदीप घोरपडे यांनी, “बिन पैशाची निवडणूक” या विषयावर तालुक्यात 75 गावात सभा घेतल्याचे सांगितले. व 1985 पासून स्थापन झालेल्या काँग्रेस पक्षाला आज 138 वर्ष पूर्ण झालेले आहेत, त्यासाठी आम्ही 138 गावांना सभा, भेटी देऊन,बूथ लेवलचे तरुण कार्यकर्ते वाढवू. आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुक लढणार्‍या नि या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. तसेच मध्यंतरीच्या काळात, श्री संदीप घोरपडे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटना संबंधी उहापोह करताना, बापूसाहेब शांताराम पाटील, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष श्री अविनाश पाटील, अमळनेर शहराचे माजी शहराध्यक्ष श्री लोटन चौधरी यांनी संदीप घोरपडे यांना, भरपूर संपर्क वाढवून, येत्या विधानसभा निवडणुकीत निवडून येण्याचे आशीर्वाद दिलेत. त्यानंतर जिल्हा उपाध्यक्ष श्री गोकुळ बोरसे यांनी अमळनेर तालुक्याच्या मतदाना च्या आकडेवारीचे स्टॅटिस्टिक समजावून सांगितले. बूथ लेवल कार्यकर्त्यांना काम करण्याचे आव्हान केले.

शेवटी जिल्हा महिला अध्यक्ष, सौ. सुलोचना वाघ यांनी कार्यकर्त्यांना मनापासून व गुणात्मक काम करण्याचे अर्ज व केले. त्याशिवाय पक्ष संघटना बांधणी शक्य नाही, हे उदाहरणे पटवून दिले. युवक तालुका अध्यक्ष श्री कौस्तुभ पाटील यांनी आभाराचे गोड काम केले. कार्यक्रमास श्री हरी भिका वाणी, गजेंद्र साळुंखे, पि.वाय पाटील तुषार संदानशिव, ई घन पाटील, आर.पी चौधरी सर, रोहिदास सुखा पाटील, श्रीराम आनंदा पाटील, कन्हैयालाल कापडे, बन्सीलाल भागवत, संभाजी देशमुख, रामकृष्ण पाटील, शरद पाटील, भीमसेन पाटील, प्रमोद पाटील, जयवंत पवार ,भास्कर बोरसे, गुणवंत पाटील, पांडुरंग पाटील, सुनील पवार, अमित पवार,पुनीलाल पाटील, उत्तम पाटील,सय्यद तेली, राजू भाट, दिलीप भाऊसाहेब, आर.बि. पाटील.आनंदा धनगर, गौरव देशमुख,प्रकाश निकाम, इत्यादी कार्यकर्त हजर होते.

You cannot copy content of this page