अखिल भारतीय प्रजापती कुंभार समाज महाराष्ट्र सोशल मीडिया अध्यक्ष पदी दीपक कुंभार यांची नियुक्ती..समाज बांधवांकडून अभिनंदन.
रयतसंदेश न्यूज नेटवर्क
अमळनेर(प्रतिनिधी) दिल्ली येथील अखिल भारतीय प्रजापती कुंभकार संघ यांच्या तर्फे अमळनेर येथील सामाजिक कार्यकर्ते दीपक कुंभार (प्रजापती) यांची महाराष्ट्र सोशल मीडिया अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे, त्या आशयाचे नियुक्तीपत्र त्यांना प्रदान करण्यात आले. त्यांच्या कार्याची दखल घेत अखिल भारतीय कुंभार समाजाच्या हक्क अधिकार अबाधित राहण्यासाठी संविधानिक मार्गाने अवलंब करून कुंभार प्रजापती समाजाला न्याय देण्याचे काम पुढील काळात आपण करणार आहोत असे नियुक्ती मिळाल्यानंतर सोशल मीडिया अध्यक्ष दीपक कुंभार यांनी मनोगत व्यक्त केले.
तसेच महाराष्ट्रातील व अमळनेर येथील समाजातर्फे सोशल मीडिया अध्यक्ष दीपक कुंभार यांचे अभिनंदन करण्यात आले.