*धनदाई महाविद्यालयात मेरी माटी मेरा देश प्रतिज्ञा घेऊन क्रांती दिन साजरा*
रयतसंदेश न्युज, अमळनेर प्रतिनिधी:-
धनदाई महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत क्रांती दिन व आदिवासी दिन साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित विद्यार्थी व प्राध्यापक यांनी “मेरी माटी मेरा देश” या उपक्रमांतर्गत देशाच्या प्रगतीसाठी एकतेची व प्रयत्नांची शपथ घेतली. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील हे अध्यक्षस्थानी होते तर विचारपीठावर कार्यक्रमाधिकारी प्रा. महादेव तोंडे, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. संगीता चंद्राकर, डॉ. जयवंतराव पाटील व डॉ. लिलाधर पाटील आदी उस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते शहीद भगतसिंग व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमापूजनाने झाले. यानंतर डॉ. लीलाधर पाटील यांनी हा कार्यक्रम स्वातंत्र्य आंदोलनात आपले आयुष्य समर्पित करणाऱ्या क्रांतिकारकांचे स्मरण करण्यासाठी असून आज आदिवासी दिनही असल्याने आदिवासींची संस्कृती व योगदान याविषयी जाणण्यासाठी एकत्र आल्याचे सांगितले. यानंतर मेरी माटी मेरा देश या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रतिज्ञा घेण्याची प्रक्रिया समजून सांगितली गेली. 2047 पर्यंत भारत महासत्ता करण्यासाठी गुलामीची मानसिकता सोडून देशाच्या प्रगतीत आणि एकात्मतेत योगदान देऊ या आशयाची शपथ प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांनी उपस्थित त्यांना दिली.
याप्रसंगी क्रीडा संचालक डॉ शैलेश पाटील यांनी प्रतिज्ञा वाचून दाखवली. सदर कार्यक्रमास डॉ. किशोर पाटील, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. राहूल इंगळे, डॉ. प्रविण पवार, प्रा. मीनाक्षी इंगोले, प्रा. मेघना भावसार, प्रा.अश्विनी पाटील, प्रा. रविंद्र चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजनेच्या ५५ स्वयंसेवकांना यावेळी प्रमाणपत्र प्राप्त झाले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. महादेव तोंडे यांनी उपस्थितांचे आभार मानले व यासारख्या उपक्रमात सातत्याने सहभाग घेण्याचे आवाहन केले.