मारवड वरिष्ठ कला महाविद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा.

अमळनेर प्रतिनिधी -रयत संदेश न्यूज

मारवड ता. अमळनेर येथील ग्राम विकास शिक्षण मंडळ संचलित कै.न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न, महान शास्त्रज्ञ डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करून ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा करण्यात आला.
याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.व्हि.डी. पाटील यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
आजच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान युगात भारताच्या प्रगतीत त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे,त्यांच्या प्रेरणेने आज देशातील युवक विविध क्षेत्रांमध्ये प्रगती करत आहेत. अशा प्रकारे प्रा. व्हि.डी.पाटील यांनी त्यांच्या जीवन कार्यावर मनोगत व्यक्त केले.
सदर कार्यक्रम ग्रंथालय विभागातर्फे प्रा. विजय पाटील यांनी आयोजित करून विद्यार्थ्यांना वाचन संस्कृतीतून व्यक्तिमत्व घडते, वाचाल तर वाचाल, वाचाल तर लिहाल, वाचन महावाचन झाले पाहिजे. असे मत मांडले.
यावेळी महाविद्यालयीन प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page