अमळनेर प्रतिनिधी -रयत संदेश न्यूज
अमळनेर तालुक्यात माननीय आमदार अनिलदादा पाटील व माजी जि.प.सदस्या सौ जयश्रीताई पाटील यांचा बालेकिल्ला असलेला कळमसरे-प्र.डांगरी जिल्हा परिषद गट *खुला* झाल्याने खुल्या गटातील अनेक नवतरुणांना राजकीय वर्तुळातील प्रवेशाची संधी प्राप्त झाली आहे.
मग अश्या स्थितीत या गटातील तरुणाईकडून मोठ्या प्रमाणात आग्रह होत आहे तो माननीय आमदार अनिलदादा यांचे सुपुत्र गौतम भाऊ यांच्या नावाचा.गौतम भाऊ स्वतः सिव्हिल इंजिनिअर असून अमेरिकेतून कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट शिक्षण घेतल्यानंतर पुन्हा मायदेशी परतून सद्यस्थितीत आपल्या परिवाराचा कन्स्ट्रक्शनचा बिझिनेस अतिशय उत्तमरित्या सांभाळत आहेत.अतिशय गुणी,हुशार,सुस्वभावी,सामाजिक विचारसरणी,काहीतरी नवीन घडविण्याची उमेद असे अनेक गुण गौतम भाऊच्या अंगी असल्याने या तरुण व्यक्तीमत्वाने कळमसरे जि.प.गटातून राजकीय श्रीगणेशा करावा असा प्रचंड आग्रह गावागावातील तरुणाईकडून होऊ लागला आहे.तरुणाई आग्रही असली तरी खरेतर माननीय आमदार अनिलंदादा काय निर्णय घेतात,*दिवाळीत आपल्या सुपुत्राचे फटाके ते वाजवितात का?* याकडे संपुर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.



