अमळनेर- तालुका प्रतिनीधी
आज दिनांक 14 ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी 10.30 वाजता श्री स्वामी समर्थ मंदिरापुढील “विद्युत कर्मचाऱ्यांच्या पतपेढीत” संपन्न झाली.सभेत जिल्हा परिषद व पंचायत समित्या तसेच नगरपालिका निवडणुकीतील, नुकत्याच निघालेल्या आरक्षणावर चर्चा झाली. अमळनेर तालुक्यातील सर्व पाचही जिल्हा परिषद गट व 10 पंचायत समिती गणांचे आरक्षण तालुका अध्यक्ष श्री सूर्यवंशी यांनी समजावून सांगितले. नगरपालिका वार्ड आरक्षण व प्रभाग संबंधी माहिती, शहराध्यक्ष श्री गजेंद्र साळुंखे यांनी दिली. या चर्चेबरोबरच उपस्थितनी जिल्हा परिषद व पंचायत समिती तसेच नगरपालिका निवडणुकांसाठी संभाव्य उमेदवारांच्या नावांची चर्चा केली. त्यात स्वतःहून उमेदवारांनी पुढाकार घेत, जाणवे मंगरूळ जिल्हा परिषद मतदार संघासाठी श्री कृष्णा रामदास पाटील यांनी तर पातोंडा अंमलगाव व दहिवद पातोंडा जिल्हा परिषद मतदार संघासाठी देखील नावे पुढे आली. तसेच नगरपालिकेतील लोकनियुक्त नगराध्यक्षां पदासाठी श्रीमती दिपाली विजय बाविस्कर व श्रीमती शोभाबाई भीवसान ग ढ रे यांनी स्वतःहून सक्षमपणे निवडणूक लढवू, असे सांगितले. या चर्चेत श्री मनोज पाटील, एड. रज्जाक शेख, भास्कर बोरसे, दिलीप पाटील, गुणवंत गुलाबराव पाटील, पितांबर पाटील, अशोक शत्रुघ्न पाटील, राजेंद्र चौधरी, भिकाजी रामचंद्र पाटील, सईद तेली यांनी भाग घेतला.तर नगरपालिका व जिल्हा परिषद पंचायत समिती उमेदवारांसंबंधी, स्वतंत्र मीटिंग बोलण्याची उपस्थि तानी मागणी केली. त्यानंतर विषय निघाला निवडणूक स्वबळावर की महाविकास आघाडी तर्फे लढण्याचा. त्यात श्री बी.के.सूर्यवंशी यांनी स्पष्टीकरण दिले की, आत्ताच प्रदेश अध्यक्ष श्री हर्षवर्धन जी सपकाळ यांनी जिल्हा निहाय आढावा बैठक नाशिक येथे बोलावली होती. त्यात निवडणूक स्वबळावर लढवावी की महाविकास आघाडी तर्फे, याचे स्वातंत्र्य तालुका काँग्रेस कमिटीला दिलेले आहे. परंतु त्यासंबंधी आपल्याला जिल्हा अध्यक्षांना अवगत करावे लागेल.
त्यानंतर श्री संदीप घोरपडे यांनी काँग्रेस पक्षातर्फे कामतवाडी ते कपिलेश्वर अशी पदयात्रा संबंधी माहिती दिली. सदर पदयात्रा 21 ऑक्टो.ते 24 ऑक्टोबर 2025 दरम्यान निघेल.त्यात शेतकऱ्यांचे, कामगारांचे, बेरोजगारांचे, लग्न न होत असलेल्या तरुणांचे प्रश्न उपस्थित केल्या जातील. उपस्थितांकडून पदयात्रेसाठी आर्थिक योगदान ही मिळाले. व सर्वांनी शक्य असेल त्या गावी पदयात्रेत सामील व्हावे, अशी विनंती केली. तसेच श्री भागवत गुरुजी यांनी पदयात्रेसंबंधी माहिती देताना जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. श्री अशोक बळीराम पाटील यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानताना, श्री पी वाय पाटील यांनी सभेसाठी जागा, (हाल) उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक आभार मानले. सभेस संदीप गधरे ,त्र्यंबक बिबीशन पाटील, लोटन मोतीराम पाटील, अनिल माधराव पाटील, शालिग्राम पाटील, शरद पितांबर पाटील, नागराज भालेराव पाटील, सुधाकरजी भैसे, अनिल मधुकर पाटील, राकेश पवार, इत्यादी इत्यादींची उपस्थिती होती खेळीमेळीच्या वातावरणात अध्यक्षांचे परवानगीने सभेचे काम संपवण्यात आले.



