अमळनेर प्रतिनिधी -रयत संदेश न्यूज
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत कोंढावळ येथे गावात लोक चळवळ उभी करून गावातील सर्व पदाधिकारी यांना लोक चळवळीद्वारे सामूहिक श्रमदानाचा मागील पाणी फाउंडेशन यातील अनुभव सगळ्या लोकांना होता, तोच उद्देश डोक्यात ठेवून याही वेळी सगळ्या बचत गट महिला, शेतकरी गट, महिला मंडळ, शाळेतील विद्यार्थी, शिक्षक स्टॉप, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी, अंगणवाडी सेविका, गावातील मित्र मंडळ ,भजनी मंडळ, विकास सोसायटी चेअरमन व सर्व सदस्य,सर्वे गावातील पदाधिकारी, गावातील सर्व ग्रामस्थ , व प्रत्येक समाजातील घटक यांनी प्रत्येकाने सहभाग नोंदवून गावात वनराई बंधारा बांधकामास मदत केली. अशा कामांमुळे आपल्या शिवारातील पाणलोट क्षेत्रात वाढ होईल लक्षात आले सगळ्यांनी उत्साहात सहभाग घेतला . प्रत्येक कामात असाच सहभाग दाखवू अशा आश्वासन दिले.



