कन्हेरे येथे चिंचदेवी यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रंगली बैलगाडी शर्यत

अमळनेर : रयत संदेश न्यूज

कान्हेरे येथे जवळपास ४०० वर्षाची परंपरा कायम राखत दरवर्षाप्रमाणे कार्तिक महिन्याच्या अष्टमीनिमित्त यंदाही १२ नोव्हेंबर पासून दोन दिवस कन्हेरे येथे चिंचदेवी यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर १० रोजी बैलगाडी शर्यत घेण्यात आली. शर्यतीचे उद्घाटन इंजिनिअर संगीता दिनेश पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.
१२ रोजी सकाळी चिंचदेवी मंदिराला ध्वज लावूून यात्रोत्सवाला प्रारंभ होणार आहे. दोन दिवस सुरू राहणाऱ्या यात्रोत्सवाला पंचक्रोशीतील हजारो भाविकांची उपस्थिती लाभते. यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठ वर्षापासून यात्रेच्या दोन दिवस अगोदर बैलगाडींची शर्यत लावली जाते. यंदाही १० रोजी इंजिनिअर संगीता दिनेश पाटील यांच्याहस्ते उद्घाटन करून शर्यतींची सुरूवात करण्यात आली. या शर्यतीत छत्रपती संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर, नाशिक, जळगाव आदी जिल्हातील सुमारे ९० बैलगाड्यांनी सहभाग घेतला होता.
या शर्यतीत विजेत्यांना बक्षिसेही देण्यात आले. यावेळी दहिवद माजी सरपंच जयवंत गुलाबराव पाटील, पं.स.चे माजी उपसभापती सुभाष देसले, दहिवद माजी उपसरपंच प्रवीण माळी, संकल्प बचत गट प्रमुख गोकुळ माळी, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी पारधी, चिंचदेवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अरुण पुंडलिक पाटील, रवींद्र नागराज पाटील, बारकू गोरख पाटील, गोविंद आप्पा, दिनेश पाटील, विलास पाटील, सुपडू पाटील, संजीव भाऊसाहेब, मधुकर पाटील, गोपाल नेरकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page