मराठी वाड्ंमय मंडळ, अमळनेर त्रैवार्षिक निवडणुकीत पतंगाने घेतली गगनभरारी.डाॅ.अविनाश जोशी यांची अध्यक्षपदी निवड.

अमळनेर प्रतिनिधी.-रयत संदेश न्यूज नेटवर्क

रावसाहेब नांदेडकर सभागृह न्यू प्लॉट अमळनेर येथे मराठी वाड्ंमय मंडळ अमळनेर त्रेवार्षिक निवडणूक 2025 ते 2028 *अभिजात मराठी पॅनल चा दणदणीत विजय*. यात एकूण मतदार 169 होते तर 152 मतदारांनी मतदान केले. यात मानाचे पद अध्यक्षपदाचे उमेदवार आदरणीय डॉ. जोशी अविनाश रघुराज.विजयी झाले  आणि उपाध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.रविंद्र कुलकर्णी, विवेकानंद भांडारकर.कार्यवाह पदाचे उमेदवार श्री.मगर भैय्यासाहेब अशोकराव प्रा. पवार शाम साहेबराव . प्रदिप साळवी,कोषाध्यक्षपदाचे उमेदवार उदय देशपांडे,व प्रा.सुरेश माहेश्वरी यांनी ईश्वर चिठ्ठी ने दिड,दिड वर्षे वाटून घेतली. तर कार्यकारी सदस्य पदाचे उमेदवार श्री भागवत बन्सीलाल ,सौ. एकतारे स्नेहा. श्री घोरपडे संदीप बाबुराव, सौ.लांडगे वसुंधरा दशरथ. प्रा.डाॅ.तुंटे विजयकुमार ,सौ.कांचन शहा सोमनाथ ब्रम्हे, ऍड.के.व्ही.कुलकर्णी व अनिल सोनार यांनी दिड दिड वर्षे वाटून घेतली आहे.यांचा प्रचंड मतांनी विजय झाला असून त्यांनी मतदारांचे आभार मानले आहेत आणि यापुढे मराठी वाड्ंमय मंडळाला अभिजात मराठी पॅनल च्या सहाय्याने भरभरून कार्यक्रम देऊन साहित्य क्षेत्रात नावलौकिक मिळवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून भाऊसाहेब देशमुख,विजय बोरसे, दिनेश नाईक यांनी कामकाज पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page