मोफत नेत्र तपासणी शिबिर : उजेडाकडे एक पाऊल.

चाळीसगाव प्रतिनिधी -रयत संदेश न्यूज

लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. प्रतिभाताई मंगेश चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त, आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी उपक्रमाला आज आणखी एक यशस्वी टप्पा पार पडला आहे.

आज मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी दुसरी बॅच – ५० रुग्णांची शंकरा आय हॉस्पिटल येथे पाठविण्यात आली आहे.

आनंदाची बाब म्हणजे पहिल्या बॅचमधील सर्व रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया होऊन ते सुखरूप घरी परतले आहेत.

🏥 येत्या दोन दिवसांत दुसऱ्या बॅचमधील रुग्णांनाही मोफत उपचार देऊन त्यांच्या आयुष्यात पुन्हा उजेड परत आणला जाणार आहे.

जनतेच्या आरोग्यासाठी सतत कार्यरत राहणाऱ्या आमदार मंगेशदादा चव्हाण व या उपक्रमात योगदान देणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार.

#MangeshDadaChavan #PratibhaTaiChavan #Chalisgaon

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page