अमळनेर, न्यू प्लॉटमधील घर जमीन दोस्त करणाऱ्या सरजू गोकलानी,महेश देशमुख व गाव गुंडा ना अटक करा व सदर प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करा.     प्रा अशोक पवार उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट )

अमळनेर प्रतिनिधी – रयत संदेश न्यूज नेटवर्क

 

अमळनेर न्यू प्लॉटमधील देशमुख चाळीतील शरद शिंदे यांचे 10 फेब्रुवारी 2026 रोजी राहते घर जेसीपी ने उध्वस्त करणारे सरजू गोकलानी, महेश देशमुख व गावगुंड अजूनही मोकाट फिरत आहेत त्यांना त्वरित अटक करा.अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी यांनी 24 तास उशिरा फिर्याद नोंदविली व फिर्यादीस समेंट करण्यासाठी दडपण आणले अशा पक्षपाती व बिल्डरांची बाजू घेणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांकडून सदर प्रकरणाचा तपास काढून घ्या व सीआयडी मार्फत चौकशी करा अशी मागणी जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस( शरद पवार गट )उपाध्यक्ष प्रा अशोक पवार यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

देशमुख चाळीतील सुमारे 20 भाडेकरू असून त्यात नयन शरद शिंदे व योगेश रमेश पवार हे केंद्रीय राखीव पोलीस दलात कार्यरत आहेत. देशाच्या संरक्षणासाठी प्रसंगी प्राण देणाऱ्यांचे कुटुंब अमळनेरात सुरक्षित नाही. ही साने गुरुजींच्या कर्मभूमीत लाजिरवाणी घटना आहे.धन दांडगे पोलिसांच्या सहकार्याने गरिबांना उध्वस्त करण्याचे पाप करीत आहेत. त्यामुळे गरीब व महिला वर्ग भयभीत झाला असून ते घरे सोडून इतरत्र पळ काढत आहेत आणि धनदांडगे मात्र दिवसाढव्या कायदा हातात घेत आहेत.

वरील प्रकरणाची आमदार अनिल भाईदास पाटील व खासदार स्मिताताई वाघ यांनी गंभीर दखल घ्यावी व ही गुंडगिरी मोडून काढावी अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे. अमळनेरच्या इतिहासात प्रथमच अशी काळी कूट घटना घडली आहे, याची गंभीर दखल अमळेकरांनी घ्यावी व आगामी होणाऱ्या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन भाडेकरुंच्या वतीने करण्यात येत आहे.

आतापर्यंत बिल्डरांच्या दबावाला बळी पडून ज्यांच्या जागा त्यांनी ताब्यात घेतल्या आहे अशांनी प्रा अशोक पवार यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे. वरील प्रकरणी भाडेकरू व सामाजिक कार्यकर्ते मा उच्च न्यायालय,खंडपीठ औरंगाबाद. मा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य. म. पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य. डी आय जी नाशिक परीक्षेत्र. मा. महसूल आयुक्त, नाशिक. मा.जिल्हाधिकारी, जळगाव व मा. डीवायएसपी,अमळनेर यांची भेट घेऊन कारवाईची मागणी करणार आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page