अमळनेर प्रतिनिधी -रयत संदेश न्यूज
ग्रामविकास शिक्षण मंडळाचे आद्य संस्थापक शिक्षण महर्षी आणि सहकार क्षेत्रातील आदरणीय कै.न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील यांच्या 33 व्या पुण्यतिथी निमित्त कै.न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस संस्थेचे अध्यक्ष आदरणीय आबासो. श्री.जयवंतराव मन्साराम पाटील यांनी
न्हानाभाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले,
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एस. देसले, उप प्राचार्य डॉ.व्हि.डि.पाटील यांनी त्यांच्या प्रेरणादायी कार्याची माहिती दिली, शिक्षण व सहकार क्षेत्रातील कार्यातून त्यांनी ग्रामीण विकासाची वाटचाल घडवली. शिक्षण आणि सहकार या दोन माध्यमातून ग्रामीण समाजात विकासाला दिशा दिली. त्यांची विचारधारा आजही आपल्याला मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरते. त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन समाजसेवेचा संकल्प होतो आहे.
सदर कार्यक्रमाच्या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष आबासो. श्री.देविदास शामराव साळुंखे , सचिव आबाजी. देविदास बारकू पाटील, संस्थेचे ज्येष्ठ संचालक बापूसो.श्री. महारु रामदास सिसोदे ,भाऊसो. श्री. वाय. के.साळुंखे ,आण्णासो. श्री. सुरेशराव मन्साराम पाटील, दादासो. श्री. सुरेश भिमराव शिंदे ,भैय्यासो. श्री. दिनेश वासुदेव साळुंखे , आणि इतर संस्थेचे मान्यवर तसेच बापूसो. श्री.ए. डी.पाटील,नानासो. के. व्ही. पाटील,आणि सु.ही. मुंदडे हायस्कूल व श्रीमती द्रो.फ.साळुंखे कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक तसेच वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारी सदर कार्यक्रमास उपस्थित होते.




