मा.आमदार खान्देश मुलुख मैदान तोफ यांचे दु:खत निधन

*पांबोगिता खोऱ्यातील समाजवादी सूर्य मावळला*

अमळनेर रयतसंदेश न्युज नेटवर्क :-

क्रांतीभूमी अमळनेर येथील माजी आमदार गुलाबराव वामनराव पाटील यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले.शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या संदर्भात आक्रमक भूमिका मांडणारे,शिंगाडे मोर्चा काढणारे, अमळनेरच्या क्रांतीचा इतिहास सतत जिवंत ठेवणारे, आपल्या विचारसरणीशी जी समाजवादी,सत्यशोधकी व समाज परिवर्तनाचा ध्यास घेणारी होती त्याचे ज्वलंत मूर्तिमंत उदाहरण म्हणजे त्यांचे स्वतःचे जीवन होते. त्यांनी कुठेही विचारांशी प्रतारणा केली किंवा धोका दिला नाही. *पांझरा बोरी गिरणा तापी(पांबोगीता)* या नद्यांच्या खानदेशी खोऱ्यातील एक समाजवादी सूर्य,परिवर्तनाचा वाटसरू आज नाहीसा झाला आहे. त्यांच्या प्रती समाज कायम ऋणी राहील.त्यांना विनम्र शिवांजली अर्पण करत आहोत. *मराठा सेवा संघ,संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड*

You cannot copy content of this page