कलात्मक शिक्षकाने केली सदाबहार गाण्यांची बरसात!!
अमळनेर रयतसंदेश न्युज:-
अमळनेर शहर हे कलात्मक क्षेत्रात सुध्दा आघाडी असलेले शहर..ज्याने ह्या रसिक नगरीला ध्वनी, शब्द, वाद्य, नृत्य, नाटय याची मेजवाणी दिली त्याची ही नगर मोहात, प्रेमात पडते..असाच सुंदर अनुभव सतिष कागणे सर यांनी प्रेक्षकांना देऊन मंत्रमुग्ध केले. सतिष कागणे सर पिंपळे आश्रमशाळा ह्या जिल्ह्यात नावाजलेल्या शाळेचे शिक्षक आहेत..सदर शाळेत अदयावत सुखसुविधा आहेत. सतत उपक्रमात सहभाग घेणारी शाळा म्हणून ह्या शाळेचे नाव आहे..शाळेत अध्यापना सोबत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा शिक्षक म्हणून सरांनी नाव कमविले आहे..आपल्या सुमधूर वाणीने सर्वांना आनंदी करण्याचे ब्रीद घेतलेला हा अवलिया गुरुदेव नावाचा ऑर्केस्ट्रा सुरू करुन विविध समारंभात गीत गाऊ लागला..किशोर, रफी, मन्ना डे, कुमार सानू, मुकेश ह्या दिग्गज लोकांची गाणी गाऊन गुरूदेव ऑर्केस्ट्रा अमळनेर व खान्देशात प्रसिध्द झाला..
अशा सुंदर, सुमधूर गाण्याचा कार्यक्रम अमळनेरकरांना उपलब्ध व्हावा यासाठी काही मित्रमंडळी यांनी पुढाकार घेऊन नाट्यगृहात आयोजीत केला..विनामूल्य सेवा आपुल्या हितचिंतकासाठी घडवून हा मानस ठेऊन हा युगल गीताचा कार्यक्रम 29/10/2023 ला पार पडला..कार्यक्रमाचे उद्घाटन चिंतामणी शैक्षणिक संकुलाच्या अध्यक्षा सौ. विदयाताई युवराज पाटील यांनी केले. यावेळी भगिनी मंडळाच्या सरोजताई भांडारकर, भद्रा प्रतिक माॅल चे संचालक प्रताप साळी, रायडर सायकल च्या हिना दुसाने हटके वडापावचे विजय पाटील, किर्ती कोठारे, कृष्णा बॅटरीचे महेश पाटील यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमेश काटे यांनी केले. कार्यक्रमाचे सादरीकरण मुख्य गायक सतिष कागणे, सुनिता डोंगरे, मनिषा कागणे, सविता देशमुख यांनी केले. आपल्या सुमधूर गाण्याने रसिक अगदी भान हरपून गीतांचा आनंद घेत होते. हया कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्यानेश वर्मा यांनी गीतकार, दिग्दर्शक, संगितकार यांचे मजेदार किस्से सांगून केले..स्टेज चे नियोजन विजय पवार, शरद पाटील यांच्या मार्गदर्शनाने झाले..कार्यक्रमासाठी संपर्क यंत्रणा भगिनी मंडळ मुख्याध्यापक व सर्व शिक्षक शिक्षकेतर मंडळी यांनी राबविली..तसेच भ्रमणध्वनीवरून एस .एच. भवरे सर व मित्रपरिवार यांनी संपर्क केला..आपल्या मित्रपरिवाराने, स्नेहजनांनी, रसीकांनी ह्या कार्यक्रमाला योग्य दाद दिली..