मंगळग्रह मंदिर संस्थान तर्फे मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी  74 रूग्ण पनवेल येथे रवाना 

अमळनेर प्रतिनिधी : रयत संदेश न्यूज नेटवर्क

येथील मंगळ ग्रह सेवा संस्था, ना. गुलाबरावजी पाटील सोशल फाउंडेशन (पाळधी), संकल्प सेवा फाउंडेशन (धनवाडी) व आर. झुणझुणवाला शंकरा आय हॉस्पिटल (पनवेल) यांच्यातर्फे रविवार, दि. 18 जानेवारी रोजी मंगळ ग्रह मंदिरात मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिर झाले. या शिबिराचा 190 रुग्णांनी लाभ घेतला. त्यापैकी 74 रुग्ण मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरले होते. या रूग्णांना सोमवार, दि. 19 जानेवारी रोजी सकाळी श्री मंगळग्रह मंदिर येथून विशेष वाहनाने आर. झुणझुणवाला शंकरा आय हॉस्पिटल (पनवेल) येथे शस्त्रक्रियेसाठी रवाना करण्यात आले

या शिबिरात अमळनेर, धुळे, चोपडा, जळगाव, एरंडोलसह तालुक्यातील ग्रामीण भागातील रूग्णांचा सहभाग होता. डॉ. मोहसीन सय्यद, विजय बामणे, सागर पाटील, अवंतिका गलांडे, प्रतिक्षा महाले (नेत्ररोग तज्ज्ञ, शंकरा आय हॉस्पिटल, पनवेल) यांनी तपासणी केली होती.

मंगळ ग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सहसचिव दिलीप बहिरम, विश्वस्त अनिल अहिरराव, जनसंपर्क अधिकारी रजनीकांत पाटील, गणेश शिंपी, प्रमोद पाटील, भूषण पाटील, मयूर चौधरी, किरण पाटील, वाल्मिक पाटील आदींनी सहकार्य केले. दरम्यान, सदर शिबिर दर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी श्री मंगळ ग्रह मंदिर येथे नियमितपणे होते, याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे मंगळ ग्रह सेवा संस्थेतर्फे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page