*मारवड महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी जयंती साजरा*
अमळनेर रयतसंदेश न्युज नेटवर्क:-
कै न्हानाभाऊ म. तू. पाटील कला महाविद्यालय मारवड ता. अमळनेर येथे आज मराठी विभागामार्फत कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ संजय पाटील यांनी आपल्या व्याख्यानातून कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जीवन व कव्या यांच्यावर प्रकाश टाकत त्यांच्या काव्याचा परिचय करून दिला.आसोदा येथील एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या व जळगाव येथील एका शेतकरी कुटुंबात सासरी आलेल्या, ऐन तारुण्यात वैधव्य जीवन जगणाऱ्या, सासरवासिनीने आपल्या प्रचंड प्रतिभा शक्तीच्या बळावर, उभ्या खान्देशाचे व तेथील कृषी संस्कृतीचे दर्शन आपल्या काव्यामधून घडवले आहे. म्हणून त्यांना खान्देश कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी अशा नावाने संबोधले जाते असे विचार त्यांनी आपल्या व्याख्यानातून व्यक्त केले. तसेच सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ वसंत देसले सर उपस्थित होते. बहिणाबाई चौधरी यांच्या प्रचंड काव्य प्रतिभेमुळे शिक्षणाचे सर्वोच्च स्थान असलेल्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला त्यांच्या नावाने सन्मानित करण्यात आले हाच त्यांच्या कार्याचा खरा गौरव आहे. असे गौरवोद्गार काढले. तसेच बहिणाबाईंच्या काव्यावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना अध्यक्षीय मनोकाताद्वारे अनमोल असे मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील एन एस एस कार्यक्रम अधिकारी डॉ दिलिप कदमसर व वि. वि. अधिकारी डॉ. जितेंद्र माळीसर, माजि. वि. वि. अधिकारी डॉ माधव वाघमारेसर, तसेच गांधी विचार परीक्षेचे समन्वयक डॉ सतिश पारधी सर व सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी उपस्थित राहून अनमोल असे सहकार्य केले. प्रस्तुत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाजमीन पठाण हिने केले आभार प्रदर्शन कोमल पाटील हिने केले सदर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.