राज्य स्तरीय निबंध स्पर्धेत जेष्ठ पत्रकार धनंजय सोनार प्रथम

उद्यान पंडित ग द माळी स्मृती राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत पत्रकार धनंजय सोनार प्रथम!

अमळनेर रयतसंदेश न्युज :-

शिरपूर विकासक व उद्यान पंडित म्हणून ओळख असलेले दिवंगत ग. द. माळी स्मृती प्रित्यर्थ आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत खुल्या गटात अमळनेर येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार धनंजय सोनार यांना प्रथम पारितोषिक जाहीर झाले आहे! त्यांनी विद्यमान मंत्री ना. छगन भुजबळ यांचे ‘ओबीसी समाजाबद्दल कार्य’ या विषयावर निबंध लिहिला. तो पारितोषिक प्राप्त ठरला.
दिनांक 2 सप्टेंबर 23 रोजी धुळे येथे रोख रक्कम व ग्रंथ देऊन धनंजय सोनार यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव होणार आहे. या स्पर्धेत प्रा. संजय सूर्यवंशी द्वितीय तर राजेंद्र सोनवणे व नामदेव जाधव यांना विभागून तृतीय बक्षीस जाहीर झाले आहे.
या स्पर्धेत राज्यातील अनेकांनी भाग घेतला होता. मानाच्या या स्पर्धेत अमळनेर च्या मातीला सन्मान मिळाला म्हणून सर्व पत्रकार बांधव, डिगंबर महाले, डॉ जी एम पाटील, संदीप घोरपडे, सतीश देशमुख, प्रा एस ओ माळी, अण्णा माळी;धुळे, आदींनी अभिनंदन केले.

You cannot copy content of this page