अमळनेर रयतसंदेश न्युज:-
पारोळा येथे मराठा सेवा संघाचा तेहतीसवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष पारोळा तालुका मराठा सेवा संघाचे अध्यक्ष डॉ.शांताराम पाटील होते.तर व्यासपीठावर जेष्ठ मार्गदर्शक पतंगराव पाटील,प्रा.जे.बी.पाटील, पी.जी.पाटील,रविंद्र पाटील, महेश पाटील, डॉ.योगेंद्र पवार,मनोहर पाटील, देविदास सोनवणे, सचिन पाटील ,सतिश माने, जिजाऊ ब्रिगेड जिल्हा महिला संघटक वैशाली पाटील, जिजाऊ ब्रिगेड तालुका अध्यक्ष अन्नपूर्णा पाटील, मोहिनी पाटील, ज्योती पाटील,मनाली पाटील उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरूवातीला राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.प्रास्ताविक प्रा.जे.बी.पाटील यांनी केले त्यांनी मराठा सेवा संघाची स्थापना, ध्येय, धोरणे व उद्दिष्टे सांगितले.यानंतर स्वयंम मंगेश शिरोळे,विश्वराज विशाल सोनवणे या विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची माहिती सांगितली.त्यानंतर तालुका उपाध्यक्ष राजकुमार पाटील तसेच प्रतिक मराठे,प्रविण पाटील यांना शहर उपाध्यक्ष म्हणून मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.डॉ.योगेंद्र पवार,पी.जी.पाटील , पतंगराव पाटील, अन्नपूर्णा पाटील यांनी मराठा सेवा संघाच्या विविध कक्षांचे व जिजाऊ ब्रिगेडच्या कार्याची माहिती दिली.उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर वही व पेन देण्यात आले.जालना येथे मराठा आरक्षण कार्यकर्त्यांवर झालेल्या लाठीचार्जचा निषेध करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.जे.बी.पाटील व आभार प्रदर्शन देविदास सोनवणे यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व कार्यकर्ते व शितल अकॅडमीचे सहकार्य लाभले.