*विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका करून केली कृतज्ञता व्यक्त*
अमळनेर रयतसंदेश न्युज:-
विद्यार्थ्यांच्या सदोदीत हिताचा विचार करणारी कळमसरे येथील शारदा माध्यमिक विद्यालय ही गुणवत्ता व सहशालेय उपक्रम घेऊन विद्यार्थ्यांना घडवीत असते. ५ सप्टेंबर शिक्षक दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या शिक्षकाची भूमिका करीत शिक्षक दिन साजरा केला.
अध्यापनाचे कार्य आटोपल्यानंतर डॉ. राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त व जोतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणाच्या अप्रतिम कार्यावर प्रकाश टाकण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे पर्यवेक्षक अधिकारी जी.टी.यांनी केले. सर्वप्रथम डॉ.राधाकृष्ण व सावित्रीमाई व ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमांना शाळेच्या उपाध्यक्ष श्री यादव चौधरी, संचालक दिपचंद छाजेड व गोटू नाना यांच्यामार्फत प्रतिमा पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांचे मनोगत झाल्यानंतर शिक्षकांमधून श्री.एस. एच भवरे सरांनी शिक्षणाची जगात सुरुवात कधी झाली ते महात्मा फुले यांच्या शिक्षणाच्या श्रीगणेश संदर्भात सविस्तर माहिती दिली. गावचे प्रतिष्ठित नागरिक श्री किसन राजपूत यांनी शिस्तबद्दल मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक डी. डी. जाधव यांनी आभार मानले.