अमळनेर येथे “मिल के चलो” च्या ४थ्या वर्धापन दिनी विविध कार्यक्रमाचे आयोजन…
अमळनेर रयतसंदेश न्युज :-
अमळनेर येथील मिल के चलो असोसिएशन या सेवाभावी संस्थेच्या ४ थ्या वर्धापन दिनानिमित्त ०९ सप्टेंबर २०२३ रोजी अनेक शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ८:३० वा. अमळनेर तालुक्यातील विज्ञान शिक्षकांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून भारत सरकारची अग्रनामांकित विज्ञान शिक्षण संस्था आयसर (IISER), पुणे येथील संस्थापक शास्त्रज्ञ मा.डॉ.अरविंद नातू व अध्यक्ष म्हणून जळगाव येथील नोबेल फाऊंडेशनचे संस्थापक मा.श्री.जयदीप पाटील सर हे उपस्थित होते. या कार्यशाळेत विज्ञान शिक्षण आणि संशोधनातील संधी यावर डॉ नातू यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष जयदीप पाटील यांनी शिक्षकांना नोबेल पारितोषिक मिळवणारे मुले कसे घडवता येतील याबाबत मार्गदर्शन केले. जयदीप पाटील सरांनी मिल के चलो संस्थेच्या कार्याचे मनापासून कौतुक करत संस्थेसाठी नेहमी सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली. कार्यक्रमाच्या शेवटी मिल के चलो असोसिएशनचे संस्थापक अनिरुध्द पाटील व कल्याणी पाटील यांनी संस्था नेहमीच शिक्षक व विद्यार्थ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहील असे आश्वासन दिले. त्यानंतर निवडक मुलांचे विज्ञान प्रदर्शन आयोजित केले होते. यात प्रामुख्याने नंदगाव, पिंगळवाडे, गडखांब व देवगाव-देवळी येथील जि.प.शाळांचे विद्यार्थी आणि वावडे येथील श्री बी.बी.ठाकरे हायस्कूलचे विद्यार्थी यांचे पोस्टर प्रदर्शन, विज्ञान प्रदर्शन व निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. सायंकाळी वर्धापन सोहळा सर्वांसाठी खुला करण्यात आला होता. यात विविध स्पर्धा व प्रदर्शनात विजयी मुलांना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ.अरविंद नातू व कार्यक्रमाच्या अध्यक्षा जेष्ठ शिक्षणतज्ञ हेमाताई होनवाड यांच्या हस्ते बक्षिस वाटप करण्यात आले. सकाळ व सायंकाळच्या कार्यक्रमात शिक्षकांसह विद्यार्थी व पालकांची देखील उपस्थिती उल्लेखनीय होती. या कार्यक्रमात मिल के चलो संस्थेच्या विविध उपक्रमात सहभागी विद्यार्थी व शिक्षक यांनी आपले अनुभव कथन केले. सकाळ सत्रातील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे मार्गदर्शक श्री दत्तात्रय सोनवणे सर व चंद्रकांत पाटील सर यांनी केले. कार्यक्रमात अमळनेर तालुका विज्ञान मंडळाचे अध्यक्ष श्री निरंजन पेंढारे सर कार्याध्यक्ष श्री.डी.के.पाटील सर उपाध्यक्ष श्री जगदीश पाटील सर, श्री एस.डी.देशमुख सर, आर.एस.पाटील सर, जी.डी.पाटील सर, प्रमिला अडकमोल मॅडम, भाग्यश्री वानखेडे मॅडम यांनी विज्ञान मंडळातर्फे डॉ.अरविंद नातू यांचा सत्कार केला. सायंकाळच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सल्लागार तथा मार्गदर्शक श्री निरंजन पेंढारे सर व श्री उमेश काटे सर यांनी केले. उपस्थितांचे आभार संस्थेचे संचालक श्री प्रकाश पाटील सर व सौ करुणा पाटील मॅडम यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजनात संस्थेचे सदस्य श्री सिद्धार्थ पाटील, सौ. प्राजक्ता पाटील, प्रा.विनायक पाटील, श्री चेतन वैराळे, वैष्णवी ठाकरे, प्रिया ठाकरे, श्री गोपाल गावंडे, श्री सुनिल पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले.