*किसान महाविद्यालयात ‘तणाव कॉपी मुक्त परीक्षा’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन*
अमळनेर रयतसंदेश न्युज नेटवर्क :-
सदर कार्य शाळेत 141 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. सदर कार्यशाळेत प्रमुख साधन व्यक्ती म्हणून प्रा. अरविंद भंडारे , यांनी विद्यार्थ्याना तणाव व परीक्षा परीक्षा यांच्यात समन्वय कसा साधावा, भीती वर मात करून आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जाण्याविषयी मार्गदर्शन केले. तर द्वितीय सत्रात कॉपी मुक्त परीक्षा व कॉपी संदर्भातील शिक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांच्या त्यासंदर्भातील विभिन्न शंकांचे निरसन केले.
अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाय व्ही. पाटील होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी प्रत्येकाच्या महाविद्यालयीन जीवनातील परीक्षा , त्यामुळे निर्माण होणारा ताण व त्यावर समुपदेशनाची गरज व त्याचे महत्व अधोरेखित केले. शिवाय कॉपी टाळून आत्मविशवासपूर्वक परीक्षेला सामोरे जाण्यासंदर्भात विविध बाबीही विद्यार्थ्याना कथन केल्या. उद्घाटन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. जी.एच.सोनवणे यांनी केले. उद्घानप्रसंगी त्यांनी प्रत्येक बाबीमध्ये तणाव कसा हाताळावा, व एकाग्र पणे अभ्यास करून तणावाचे व्यवस्थापन व परिक्षेत गैरप्रकार व त्यासाठीच्या शिक्षा व गैरप्रकार टाळण्यासाठी घ्यावयाची दक्षता याविषयी विद्यार्थ्याचे उद्-बोधन केले. शेवटी सर्व विद्यार्थीनी शपथ घेऊन कॉपी मुक्त परीक्षा देऊ यासंधर्भात सामूहिक शपथ घेतली.प्रास्ताविक डॉ. किरण पाटील मांडले. सूत्र संचालन. प्रा अनिल वाघमारे यांनी तर आभार डॉ. आर एस माळी यांनी मानले. डॉ. प्रफुल्ल ठाकरे व प्रा. निलेश वळवी यांनी तांत्रिक सहकार्य केले. विद्यार्थी विकास विभाग, परीक्षा विभाग व महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यशाळा यशस्वितेसाठी मेहनत घेतली.सदर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. सतीश पाटील यांनी सर्वांचे कौतुक केले.