मारवड परिसर विकास मंच व मिलके चलो फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यात फिरत असलेली डॉक्टर कलाम फिरती प्रयोगशाळा *साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालय,अमळनेर येथे आली. त्यात 250 विद्यार्थ्यांनी त्या फिरत्या प्रयोगशाळेचा लाभ घेतला.
अमळनेर रयतसंदेश न्युज :-
अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे, संस्थेचे सचिव संदीप घोरपडे, मुख्याध्यापक सुनील पाटील मिलके चलो फाउंडेशनचे अनिरुद्ध पाटील, विज्ञान अध्यापक मंडळाचे तालुकाध्यक्ष निरंजन पेंढारे, टीडीएफचे उमेश काटे, पीएसआय शरद पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, साने गुरुजींच्या कर्मभूमीत विज्ञान प्रचार आणि प्रसाराचे काम होत आहे याचा मला मनस्वी आनंद आहे. तसेच आयकर आयुक्त संदीप कुमार साळुंखे यांच्या दातृत्वाविषयी त्यांनी आभार व्यक्त केले. संस्थेचे सचिव संदीप घोरपडे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की सर्व बाजूला व्यवस्था किडलेली असताना विज्ञान प्रचार आणि प्रसारासाठी पुढाकार घेतल्याने निश्चितपणाने विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल त्याबद्दल समाधान व्यक्त केले. अनिरुद्ध पाटील यांनी फिरत्या प्रयोगशाळेची भूमिका स्पष्ट केली. दिवसभर विद्यार्थ्यांनी प्रयोगशाळेची माहिती जाणून घेतली, प्रत्येक प्रयोग जाणून घेण्याची उत्सुकता, कुतूहल विद्यार्थ्यांमध्ये दिसून आली. यशस्वीतेसाठी विनायक पाटील, डी के पाटील, कल्याणी पाटील, डी ए धनगर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी ए धनगर यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक सुनील पाटील यांनी केले.
त्या फिरत्या प्रयोगशाळेचा लाभ घेतला.
अमळनेर रयतसंदेश न्युज :-
अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे, संस्थेचे सचिव संदीप घोरपडे, मुख्याध्यापक सुनील पाटील मिलके चलो फाउंडेशनचे अनिरुद्ध पाटील, विज्ञान अध्यापक मंडळाचे तालुकाध्यक्ष निरंजन पेंढारे, टीडीएफचे उमेश काटे, पीएसआय शरद पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, साने गुरुजींच्या कर्मभूमीत विज्ञान प्रचार आणि प्रसाराचे काम होत आहे याचा मला मनस्वी आनंद आहे. तसेच आयकर आयुक्त संदीप कुमार साळुंखे यांच्या दातृत्वाविषयी त्यांनी आभार व्यक्त केले. संस्थेचे सचिव संदीप घोरपडे सर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की *सर्व बाजूला व्यवस्था किडलेली असताना विज्ञान प्रचार आणि प्रसारासाठी पुढाकार घेतल्याने निश्चितपणाने विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल त्याबद्दल समाधान व्यक्त केले*. अनिरुद्ध पाटील यांनी फिरत्या प्रयोगशाळेची भूमिका स्पष्ट केली. दिवसभर विद्यार्थ्यांनी प्रयोगशाळेची माहिती जाणून घेतली, प्रत्येक प्रयोग जाणून घेण्याची उत्सुकता, कुतूहल विद्यार्थ्यांमध्ये दिसून आली. यशस्वीतेसाठी विनायक पाटील, डी के पाटील, कल्याणी पाटील, डी ए धनगर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी ए धनगर यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक सुनील पाटील यांनी केले.