पटवारी काँलनी अमळनेर येथे बलीप्रतिपदे ला वामन दहन संपन्न.

*आज बलिप्रतिपदेला अमळनेरात वामन दहन!*                                                           अमळनेर रयतसंदेश न्युज नेटवर्क:-

अमळनेर : महात्मा बळीराजाला वामनाने मारले,कपटाने पाताळात घातले.दरवर्षी बलिप्रतिपदेला अमळनेर येथे मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेड चे कार्यकर्ते महात्मा बळीराजाची मोठी मिरवणूक काढतात, ज्या बळीराजाला शेतकऱ्यांचा आदर्श राजा मानतो‌.त्या बळीराजाला वामनाने कपटाने पाताळात घातले.त्यामुळे आज बलिप्रतिपदेला सायंकाळी ठिक ६ वाजता त्या वामनाचे दहन सालाबादप्रमाणे अंमळनेर येथील पटवारी काॅलनीत करण्यात आले.
गेल्या १४ पासून दरवर्षी मराठा सेवा संघाचे प्रमुख कार्यकर्ते शिवश्री मनोहर शंकर पाटील( नाना)हे वामन दहनाचा कार्यक्रम आयोजित करतात व वामनाचे दहन करतात.वामन दहनाची सुरूवात शिवश्री मनोहर निकम यांनी २००९ सालापासून केली आहे.आदर्श राजा रावण असल्याने सुध्दा रावण दहन केले जाते.रावणाने तर सितेला स्पर्श ही केला नाही. वामन तर कपटी व दृष्ट होता,अश्या क्रूर वामन याने आदर्श बळीराजाला कपटाने मारले ,पाताळात घातले तरी अशा दृष्ट ,कपटी वामनाचे दहन का करू नये ? म्हणून मोठ्या संख्येने मराठा सेवा संघाचे कार्यकर्ते जमतात व वामन दहन करतात. या कार्यक्रमाला संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ ,जिजाऊ ब्रिगेड चे सर्व पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page