*सर्वसमावेशक आंबेडकर – महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा आढावा घेणारा लेख*
अमळनेर रयतसंदेश न्युज नेटवर्क :-
देशाच्या स्वातंत्र्याचा जल्लोष देशभरात सुरू असताना स्वातंत्र्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 16 ऑगस्ट रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी विराट मोर्चासह ‘ये आजादी झुटी है इस देश की जनता भुकी है!’ हा नारा दिला अण्णाभाऊंचा हा नारा स्वातंत्र्य भारतातील दिन दलित शोषित उपेक्षित वंचित घटकांच्या समस्यांचा भाव व्यक्त करणारा होता, त्याचवेळी शोषणाविरुद्ध पोषणाची आणि अन्यायाविरुद्ध न्यायाची व्यापक लढाई लढण्याचे बळ डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने स्वतंत्र भारतामध्ये सुरू होते असे असले तरी जातीयवादी चष्म्यातून किंवा जातीय राजकारणाच्या गरजेतून डॉ. आंबेडकर आणि दलित एवढेच समीकरण इतिहासाच्या आणि वर्तमानाच्या सामाजिक पटलावर प्रस्थापित व्यवस्थेद्वारे जाणीवपूर्वक ठेवले गेले त्यामुळे आजच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून आंबेडकरांचे अनेक क्षेत्रांमध्ये असणाऱ्या उल्लेखनीय कार्याचे विवेचन करणे क्रमप्राप्त ठरते.
*डॉ. आंबेडकर आणि कामगार*
कोणत्याही नेतृत्व घडत असताना त्याची जडणघडण महत्वपूर्ण ठरत असते आंबेडकरांचे बालपण वस्त्यांमध्ये आणि चाळींमध्ये गेले असल्याने चाळींमध्ये राहणाऱ्या कष्टकरी कामगारांच्या समस्या आंबेडकरांना ज्ञात होत्या. पुढे बॉम्बे टेक्स्टाईल आणि लेबर युनियन सारख्या संघटनांचे नेतृत्व करीत असताना कामगारांच्या समस्यांची व्यापकता त्यांना प्रकर्षाने जाणवली यातूनच कामगारांचे शोषण संपावे त्यांचे एकसंघ संघटन असावे व कामगारांनी राजकीय शक्ती म्हणून काम करावे असा मानस आंबेडकरांनी मनाशी बाळगला होता. पुढे कामगार मंत्री झाल्यावर त्यांनी चार वर्षाच्या काळात चार त्रिपक्ष परिषदा घेतल्या त्यात किमान वेतन कायदे कामाचे तास कामगारांसाठी उपहारगृह महागाई निर्देशका नुसार महागाई भत्ता रास्तभावातील धान्य केंद्र जास्त श्रम करणाऱ्या कामगारांना जास्त शिधापत्रे प्रॉव्हिडंट फंडची नियमावली कामगारांचे सेवांतर्गत प्रशिक्षण कामगारांच्या पाल्यांना शिक्षण तसेच कामगारांना नुकसान भरपाई देण्यासाठी विमा संरक्षण लागू करण्यात आले त्यावेळी आंबेडकरांनी कायम कामगारांना 48 तर हंगामी कामगारांना 54 तास कामाची मर्यादा निश्चित केली सोबतच स्त्री कामगारांसंबंधीचे धोरण ठरविले
*वित्त आणि डॉ. आंबेडकर*
1948 ते 1956 या दुसऱ्या टप्प्यात डॉक्टर आंबेडकरांच्या विचारात अमुलाग्र बदल झाला 1947 पूर्वी भांडवलशाहीच्या मर्यादा लक्षात घेऊन त्यांनी अनेक आर्थिक धोरणांचा सल्ला दिला परंतु भांडवलशाहीला पूर्णविरोध असल्याचे त्या काळात दिसत नाही भांडवलशाही ऐवजी समाजवादाचा आग्रह आहे अशा समाजवादात शेती प्रमुख उद्योगधंदे व विमा सरकारी मालकीची असावेत अशी भूमिका त्यांनी स्पष्टपणे मांडली लोकांच्या आर्थिक जीवनात क्रांतिकारक परिवर्तन घडवून आणण्यासाठी राजकीय लोकशाहीचे सामाजिक आर्थिक लोकशाहीत रुपांतर करावे लागेल असे डॉ.आंबेडकरांचे मत होते
*साहित्य आणि बाबासाहेब आंबेडकर*
बाबासाहेब आंबेडकर हे वांग्याचे व्यासंगी अभ्यासत होते वेट उपनिषदे पुराने महाकाव्य बौद्ध साहित्य बौद्ध तत्त्वज्ञान लोकसाहित्य मध्ययुगीन साहित्य आधुनिक साहित्य संस्कृत साहित्य इंग्रजी साहित्य हे त्यांच्या चिंतनाचे आवडीचे विषय राहिले आहेत या साहित्याविषयी त्यांनी भाष्य केले आहे मराठी साहित्याचा गौरव करताना त्यांनी आपली परखड मते ही मांडली आहेत बाबासाहेब आंबेडकरांनी संत साहित्याचा अभ्यास केला परिवर्तनवादी चळवळीच्या पार्श्वभूमीवर या संप्रदायाच्या सामर्थ आणि मर्यादांचे विश्लेषण केले आपल्या लेखनात आणि भाषणात संतांच्या अभंगांचा विचारांचा सखलपणे वापर डॉक्टर आंबेडकर करीत असत मूकनायक आणि बहिष्कृत भारत च्या शिरोभागी तुकाराम महाराजांचा अभंग आणि ज्ञानेश्वरीतील ओव्या मुद्रित केलेले आहेत
*ऊर्जा धोरण आणि डॉ आंबेडकर*
मजूर खाता बरोबरच डॉक्टर आंबेडकरांना ऊर्जा खाते देण्यात आले त्यांनी ऊर्जा खात्याची सूत्र हाती घेईपर्यंत केंद्राकडे विजयबाबत कोणतीच माहिती उपलब्ध नव्हती. आंबेडकरांनी वीज निर्मितीचा परिपूर्ण अभ्यास करून बीज उत्पादन वीज विकास वीजपुरवठा आधी संबंधीचे राष्ट्रीय धोरण प्रथमच आखले त्यात वीज निर्मिती साधनांच्या उत्पादनासाठी प्रयत्न केंद्रीय तांत्रिक ऊर्जा मंडळ स्थापने देशातील सर्व राज्यात वीज निर्मितीसाठी समन्वय धोरण आखणे वीज पुरवठा आणि त्यासंबंधीचे तांत्रिक प्रश्न सोडविण्यास सर्व सुविधायुक्त संशोधन संस्था स्थापने वीज वापर संवर्धित करून जलद विकासासाठी शिक्षण कार्यक्रम आखणे औद्योगिक क्षेत्रात विशेषतः खत निर्मिती सारख्या उद्योगात विजेचा वापर वाढविणे विद्युत क्षेत्रातील अभियंतांना विशेष प्रशिक्षणाची सोय करणे आदी बाबींचा समावेश करण्यात आला
एकंदरीतच डॉ. आंबेडकर हे अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे असाधारण व्यक्तिमत्व होते आंबेडकर हे केवळ दलितापूर ते मर्यादित नसून त्यांचं वित्त नियोजन ऊर्जा सहकार कायदा आरक्षण जलसंधारण अशा अनेक क्षेत्रांमध्ये अनन्यसाधारण योगदान आहे
*अॅड. कौस्तुभ पाटील*
(लेखक हे इंटक या कामगार संघटनेचे कायदेशीर सल्लागार आहेत)