पहिले अखिल भारतीय एल्गार मराठी गझल संमेलनाच्या स्वागताध्यक्ष पदी नामदार मा. अनिल पाटील

*खान्देश साहित्य संघ आयोजित पहिले अखिल भारतीय एल्गार मराठी गझल संमेलनाच्या स्वागताध्यक्ष पदी नामदार मा. अनिल पाटील तर संमेलनाध्यक्ष पदी गझलकार शिवाजीराव जवरे* यांची निवड…..
अमळनेर रयतसंदेश न्युज नेटवर्क :-

*खान्देश साहित्य संघ आयोजित पहिले अखिल भारतीय एल्गार मराठी गझल संमेलनाच्या स्वागताध्यक्ष पदी नामदार मा. अनिल पाटील तर संमेलनाध्यक्ष पदी गझलकार शिवाजीराव जवरे* यांची निवड…..

साने गुरूजी साहित्य नगरी, छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह अमळनेर येथे २७ व २८ जानेवारी २०२४, शनिवार व रविवार रोजी हे संमेलन संपन्न होणार आहे.

खान्देश साहित्य संघाव्दारा होणाऱ्या गझल संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून सर्वानुमते *नामदार मा. अनिल पाटील साहेब* (मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री महाराष्ट्र राज्य) यांची अभिनंदनीय निवड करण्यात आली. प्रतिपंढरपूर म्हणून समजल्या जाणाऱ्या अमळनेर शहरात संमेलन होत असून अमळनेर शहरातील स्थानिक लोकप्रिय लोकप्रतिनिधी असल्याने नामदार मा. अनिल पाटील यांनी स्वागताध्यक्ष व्हावे अशी सर्व साहित्यिक गझलकारांची ईच्छा होती. अमळनेर नगरीचे भूमीपुत्र असल्याने पहिला मान त्यांचा आहे अशी साहित्यिकांची भूमिका असल्यामुळे नामदार मा. अनिल पाटील यांची स्वागताध्यक्ष म्हणून अभिनंदनीय निवड करण्यात येत आहे. नामदार अनिल पाटील यांची आजवर सामाजिक व सांस्कृतिक कार्यपध्दती विशेष उल्लेखनीय असून त्यांनी गावापासून तर महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्रीपदापर्यंत मजल, ही लोकांच्या विश्वासावर असून आपल्या मायभूमीसाठी सतत धडपडणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची जनमाणसात ओळख आहे. कोणताही साहित्य प्रकार वंचित राहू नये अशी त्यांची भूमिका असते. जगभरातील विविध भाषांमध्ये लिहिला जाणारा गझल सारखा साहित्य प्रकार गझलसम्राट सुरेश भट यांच्या माध्यमातून मराठीत उंचीला गेला आणि अलिकडे नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलनात अहिराणी गझल मुशायरा चांगलाच गाजला. म्हणून मराठीच्या समृध्दतेची कास धरत असलेली अहिराणी व इतर बोलीभाषांमध्ये देखील गझल लिहिली जाते. हा धागा साने गुरूजी, बहिणाबाईंच्या खान्देश भूमीत अधिक संपन्न व्हावा व बोलीभाषांसह मराठीची समृध्दी व्हावी म्हणून गझल संमेलन होणे गरजेचे आहे. यासाठी संमेलनाच्या उत्तम आयोजन व यशश्वीतेसाठी भूमीपुत्र म्हणून नामदार दादासाहेब अनिल पाटील यांची निवड ऐतिहासिक ठरणार आहे. खान्देश साहित्य संघ आयोजित पहिले अखिल भारतीय एल्गार मराठी गझल संमेलन साहित्य प्रांतात नवा आयाम निर्माण करणारे ठरणार आहे. अशा संमेलनाचे स्वागताध्यक्ष देखील तेवढेच सन्मानजनक लाभल्याचे आयोजकांना समाधान आहे.

त्याचप्रमाणे सातत्याने गझल लेखनातून व प्रत्यक्ष जगण्यातून गझलेची अनुभूती कित्येक नवोदित गझलकारांना देणारे संमेलन अध्यक्ष व्हावे अशी सर्व साहित्यिक गझलकारांची ईच्छा असल्याने खान्देश साहित्य संघाच्या वतीने पहिल्या अखिल भारतीय एल्गार मराठी गझल *संमेलनाचे अध्यक्ष म्हणून बुलढाणा येथील जेष्ठ गझलकार मा. शिवाजीराव जवरे* यांची निवड करण्यात येत आहे. गझलकार मा. शिवाजीराव जवरे आपल्या गझल लेखनातून सामाजिक वास्तव मांडणी करतात.

मा. शिवाजीराव जवरेंची कवी, गझलकार, लेखक, व्यंगचित्रकार, पक्षीमित्र व विविध भाषा अभ्यासक म्हणून ओळख आहे. त्यांची दोन गझलप्रधान काव्यसंग्रह, गझलसंबंधी अन्य दोन पुस्तके प्रकाशित असून विदर्भाची संघर्षयात्रा हा चरित्रग्रंथ, किशोर गीत (बालगीत संग्रह), उर्दू शिका हे उर्दू शिकण्यास उपयुक्त पुस्तक, प्रभावी सुत्रसंचालन, नोंदण-गोंदण, साईन-कोसाईन इ. आठवडी सदरातील संकलनाचे लेखसंग्रह प्रकाशित आहेत.

*खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे* या विश्व बंधूतेच्या विचारांना पुढे नेण्यासाठी, गझलकार सुरेश भट साहेबांनी केलेल्या गझल प्रवासातील गझलकारांनी या संमेलनासाठी पुढाकार घेतलेला आहे. मराठी भाषेसह विविध बोलीभाषेत लेखन करणारे गझलकार सहभागासह लोकवर्गणीतून हे संमेलन घडवित आहेत. साहित्य चळवळीतील हा अनोखा उपक्रम सर्वाच्या कुतूहलाचा विषय झाला आहे. दोन दिवस चालणाऱ्या या गझल संमेलनात उद्घाटन सत्र, १६ गझल सादरीकरण सत्र, परिसंवाद व २७ जानेवारीला रात्री संमेलन स्थळी गझल गायन मैफिल देखील संपन्न होईल. मातृहृदयी साने गुरूजी साहित्य नगरी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे विविध साहित्यकृतींचे ग्रंथ प्रदर्शन व विक्री उपलब्ध असेल. फारसी, अरबी, उर्दू, हिंदी, मराठी व सध्या अहिराणी सारख्या बोलीभाषांमधून देखील गझल लेखनाचा प्रवास दिसून येतो. साहित्याला कोणतीच जात, धर्म, पंथ नसतो तर साहित्य हे सामान्य माणसांच्या जगण्याचे प्रश्न मांडत असते. साहित्य चळवळीला सुसंवादी भूमिकेतून खान्देश साहित्य संघाच्या माध्यमातून या संमेलनाचे आयोजन होत आहे. अशा मैलाचा दगड ठरणाऱ्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष नामदार मा. अनिल पाटील तर संमेलन अध्यक्ष म्हणून बुलढाणा येथील जेष्ठ गझलकार शिवाजीराव जवरे यांची निवड करण्यात आल्याचे खान्देश साहित्य संघाचे अध्यक्ष डॉ. सदाशिव सुर्यवंशी यांनी संगितले. यावेळी सचिव तथा ६ व्या अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मा.रमेश बोरसे, आयोजन समिती प्रमुख सौ. हेमलता पाटील, समिती सचिव शरद धनगर, समिती उपाध्यक्ष तथा जळगाव जिल्हाध्यक्ष डॉ. कुणाल पवार, राज्य ग्रंथालय महासंघाचे प्रदेशाध्यक्ष मा.महेंद्र बोरसे, खान्देश साहित्य संघाच्या अमळनेर तालुकाध्यक्षा मा. सुनिता पाटील, मा.रत्नाकर पाटील, मा. संजय पाटील, मा.छाया इसे, मा.शरद पाटील, मा.रामकृष्ण बाविस्कर, मा. दत्तात्रय सोनवणे, मा.गोपाल हडपे, मा. अशोक इसे, सौ.रेखाताई मराठे, मा.उमेश काटे, मा.वाल्मिक पाटील, मा.रजनीताई पाटील, मा.पूनमताई शिंदे, तेजस पाटील यांच्यासह साहित्यिक गझलकार व खान्देश साहित्य संघाचे विविध पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.

You cannot copy content of this page