तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी अमळनेरचे सुरेश बाविस्कर यांची निवड
अमळनेर रयतसंदेश न्युज नेटवर्क :-
भारतीय जनता पक्षाच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या (जळगाव पश्चिम जिल्हा) जिल्हाध्यक्षपदी येथील सुरेश भगवान बाविस्कर यांची निवड झाली आहे. बाविस्कर हे मंगळ ग्रह सेवा संस्थेचे सचिव तथा निवृत्त माध्यमिक शिक्षक आहेत.
खासदार उन्मेष पाटील व भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष (जळगाव ग्रामीण) ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांनी श्री.बाविस्कर यांना या निवडीचे नियुक्ती पत्र ६ रोजी पक्षाच्या जिल्हाकार्यालयात समारंभपूर्वक दिले. श्री.बाविस्कर यांनी भाजपचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून आजवर अनेक जबाबदाºया यशस्वीरित्या सांभाळल्या आहेत. निवडणूक काळातील केलेल्या कामाची पावती म्हणूनच पक्षाने त्यांच्यावर ही जबाबदारी टाकण्यात आल्याचे मानले जात आहे. आगामी निवडणूक काळातही ते निश्चितपणे पक्षवाढीची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडतील ,असा विश्वासही या नियुक्तीद्वारे पक्षातर्फे व्यक्त करण्यात आला आहे. श्री.बाविस्कर यांच्या निवडीचे राज्याचे ग्रामविकास व पर्यटनमंत्री गिरीष महाजन, प्रदेश महामंत्री विजय चौधरी, प्रदेश मुख्यालय प्रभारी रवी अनासपुरे, खासदार उन्मेष पाटील, रक्षा खडसे, आमदार सुरेश भोळे (राजूमामा), संजय सावकारे, मंगेश चव्हाण, माजी आमदार स्मिता वाघ, शिरीष चौधरी, प्रदेश चिटणीस अजय भोळे, जिल्हा सरचिटणीस सचिन पानपाटील, जळगाव लोकसभा निवडणुक प्रमुख डॉ. राधेश्याम चौधरी, अमळनेर भाजपा तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, शहराध्यक्ष विजय राजपूत यांच्यासह अनेक मान्यवरांनी स्वागत केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.